जिल्ह्यात आणखी आढळले 127 बाधित रूग्ण
नंदुरबार

जिल्ह्यात आणखी आढळले 127 बाधित रूग्ण

51 जण करोनामुक्त

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

नंदुरबार - Nandurbar - प्रतिनिधी :

नंदुरबार जिल्ह्यात आतापर्यंत एका दिवसात सर्वाधिक कोरोना रूग्ण आज आढळून आले. आज अहवाल प्रशासनाला प्राप्त झालेल्या अहवालांपैकी 127 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.

दरम्यान जिल्ह्यातील 51 जण कोरोना संसर्गमुक्त झाल्याने त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

नंदुरबार जिल्ह्यात गेल्या चार महिन्यात एका दिवसात सर्वाधिक आज कोरोना रूग्ण आढळून आले. जिल्ह्यातील 127 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आज अहवालावरून स्पष्ट झाले.

नविन लॅब कार्यन्वित झाल्याने प्रलंबित असलेले अहवालांची संख्या देखील कमी होतांना दिसत आहे. आहूनही 501 अहवाल प्रलंबित आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com