नंदुरबार जिल्ह्यात 121 रुग्ण करोनामुक्त,दोघांचा मृत्यू

नंदुरबार जिल्ह्यात 121 रुग्ण करोनामुक्त,दोघांचा मृत्यू

नंदुरबार - Nandurbar - प्रतिनिधी :

नंदुरबार जिल्ह्यातील 121 जण करोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

तर दिवसभरात 34 जणांचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आला आहे. तर शहादा तालुक्यातील दोघ वृध्दांचा मृत्यू झाला.

नंदुरबार जिल्ह्यात आज 101 जण करोनामुक्त झाले. त्यांना कोविड कक्षातून डिस्चार्ज देण्यात आला.

यात नंदुरबार तालुक्यातील 39, शहादा तालुक्यातील 43, अक्कलकुवा तालुक्यात 4, नवापूर तालुक्यातील 20, तळोदा तालुक्यातील 12, धडगांव तालुक्यातील 3 जणांचा समावेश आहे तर आज प्रशासनाला 80 जणांचा अहवाल प्राप्त झाला.

पैकी 34 जणांचा अहवाल हा करोना पॉझिटिव्ह आला आहे. यात नंदुरबार 11, शहादा 4, नवापूर 9, तळोदा 5, अक्कलकुवा 3, धडगांव तालुक्यातील एकाचा समावेश आहे.

प्रशासनातर्फे आतापर्यंत 38 हजार स्वॅब घेण्यात आले. त्यापैकी 30 हजार 328 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला.

जिल्ह्यात आतापर्यंत 163 जणांचा करोनामुक्त मृत्यू झाला आहे तर 6 हजार 988 कोरोना रूग्ण आढळले आहे.

त्यापैकी 8 हजार 987 जण कोरोनामुक्त झाले आहे. कोविड कक्षात 442 जणांवर उपचार सुरू आहे. आज शहादा तालुक्यातील रायखेड येथील 82 वर्षीय वृध्द व काथर्दे येथील 75 वर्षीय वृध्दाचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com