66 रुग्ण करोनामुक्त ; 96 नवे रुग्ण

66 रुग्ण करोनामुक्त ; 96 नवे रुग्ण

नंदुरबार - Nandurbar - प्रतिनिधी :

जिल्हयात आज करोनाचे 96 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर 66 रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

दरम्यान, 66 वर्षीय वृद्धाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकुण करोनाबळींची संख्या 108 झाली आहे.

नंदुरबार जिल्हयात आज 96 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यात नंदुरबार तालुक्यातील 36, शहादा तालुक्यातील 22, नवापूर तालुक्यातील 3, अक्कलकुवा तालुक्यातील 8, तळोदा तालुक्यातील 14, तर बाहेर जिल्हयातील 13 रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, आज 66 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना कोविड कक्षातून डिस्चार्ज देण्यात आला.

नंदुरबार तालुक्यातील नाशिंदे येथील 66 वर्षीय वृद्धाचा आज मृत्यू झाला. त्यामुळे जिल्हयातील कोरोनाबळींची संख्या 108 झाली आहे.

नंदुरबार जिल्हयात आतापर्यंत 14 हजार 876 संशयित रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. त्यापैकी 10 हजार 270 रुग्णांचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. तर 4 हजार 378 रुग्ण पॉझिटीव्ह आढळून आले आहेत.

आतापर्यंत 3 हजार 282 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या 1246 रुग्णांवर कोविड कक्षात उपचार सुरु आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com