जिल्ह्यात २७ जण करोनामुक्त
नंदुरबार

जिल्ह्यात २७ जण करोनामुक्त

नवीन १४ पॉझिटिव्ह रुग्ण

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

नंदुरबार - Nandurbar - प्रतिनिधी :

नंदुरबार जिल्ह्यातील 27 जण आज कोरोना संसर्गमुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. तर पुन्हा जिल्ह्यात 14 नवे रूग्ण आढळून आले आहे. दरम्यान आज नंदुरबार येथे 68 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

नंदुरबार जिल्ह्यात आज सकाळी 27 जण कोरोना संसर्गमुक्त झाल्याने त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यात नंदुरबार जिल्ह्यातील रूग्णालयांमध्ये दाखल असलेल्या 19 जणांचा समावेश आहे. यात नंदुरबार येथील 12 तळोदा येथील 5, नवापूर व धुळे येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे तर इतर जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे उपचार घेणार्‍या 8 बाधित ससंसर्गमुक्त झाल्याने त्यांनाही रूगणालयातून घरी सोडण्यात आले.

यात नंदुरबार येथील 4, तळोदा येथील 2 व शहादा व निजामपूर येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. त्यामुळे जिल्हाभरात आतापर्यंत कोरोना संसर्गमुक्त झालेल्यांची संख्या 844 झाली आहे.

आज रोजी सकाळी नंदुरबार येथील गांधीनगरमध्ये राहणार्‍या 68 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दरम्यान दिवसेंदिवस नंदुरबार जिल्ह्यात कोरोना रूग्णांची वाढत आहे. त्यात पुन्हा आज 14 जणांची भर पडली. यात नंदुरबार येथील 3, शहादा येथील 6, तळोदा 3, धडगांव व धुळे जिल्हा येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

आतापर्यंत 6 हजार 202 जणांचा स्वॅब घेण्यात आला आहे. त्यापैकीही 4 हजार 348 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे तर 1090 रूग्ण आढळून आले आहे. 15 ऑगस्ट रोजी नंदुरबार येथे आधुनिक लॅबचे उद्घाटन पालकमंत्री ना.अ‍ॅड.के.सी.पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले होते. मात्र प्रशिक्षीत कर्मचार्‍या अभावी जिल्ह्यातील संशयीत रूग्णांचे घेतलेले स्वॅब प्रलंबितच आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com