नंदुरबार - Nandurbar - प्रतिनिधी :
नंदुरबार जिल्हयात आज तब्बल 116 रुग्ण करोनामुक्त झाल्याने एकुण
करोनामुक्त रुग्णांची संख्या 1234 झाली आहे. दरम्यान, आज 84 नवे करोना रुग्ण आढळून आले. त्यामुळे एकुण कोरोना रुग्णांची संख्या 1295 झाली आहे.
नंदुरबार जिल्हयात आज तब्बल 116 रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे एकुण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 1234 झाली आहे.
दरम्यान, 84 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. यात नंदुरबार तालुक्यातील 25, शहादा तालुक्यातील 39,नवापूर तालुक्यातील 2, धडगाव येथील 1 तर बाहेरील 17 रुग्णांचा समावेश आहे.