जिल्हयात सात जण करोनामुक्त

बळींची संख्या 70 वर
जिल्हयात सात जण करोनामुक्त

नंदुरबार - Nandurbar - प्रतिनिधी :

नंदुरबार जिल्हयात आज एकाच दिवशी पाच करोनाबाधीतांचा मृत्यू झाल्याने जिल्हयातील करोना बळींची संख्या आता 70 वर पोहचली आहे. दरम्यान,

आज 66 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तसेच 7 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

नंदुरबार जिल्हयात आज एकाच दिवशी पाच जणांचा मृत्यू झाला. यात जिल्हयासह बाहेर जिल्हयातील रुग्णांचाही समावेश आहे. तळोदा येथील चाळीस वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. तीला 20 ऑगस्ट रोजी कोविड कक्षात दाखल करण्यात आले होते. तीचा आज सकाळी 9 च्या सुमारास मृत्यू झाला.

शहादा येथील 57 वर्षीय महिलेला 10 ऑगस्ट राोजी दाखल करण्यात आले होते. तीचाही आज दुपारी पाऊण वाजेच्या सुमारास मृत्यू झाला.

दरम्यान, आज जिल्हयात नवे 66 रुग्ण आढळून आले. शहादा येथील 26, नंदुरबार येथील 28, तळोदा येथील 7, जिल्हयाबाहेरील 4 रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे एकुण कोरोना रुग्णांची संख्या 2150 एवढी झाली आहे. यापैकी 962 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 1115 रुग्णांवर कोविड कक्षात उपचार सुरु आहेत.

जिल्हयाबाहेर 61 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच जिल्हाबाहेर दाखल असलेले 145 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे जिल्हा व बाहेरील कोरोना रुग्णांची संख्या 2 हजार 356 एवढी झाली आहे.

दरम्यान सात जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला. यात नंदुरबार तालुक्यातील 3, शहादा तालुक्यातील चार रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 962 झाली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com