जिल्हयात 55 जण करोनामुक्त
नंदुरबार

जिल्हयात 55 जण करोनामुक्त

8 नवे रुग्ण

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

नंदुरबार - Nandurbar - प्रतिनिधी :

नंदुरबार जिल्हयात आज 55 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. दरम्यान, आज पुन्हा 8 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यातच दोन जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 50 झाली आहे.

नंदुरबार जिल्हयात आतापर्यंत 5 हजार 912 संशयित रुग्णांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 4 हजार 217 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. 1 हजार 6 जण कोरोनाबाधीत आढळून आले आहेत. यापैकी 738 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

सध्या 311 रुग्णांवर कोविड कक्षात उपचार सुरु आहेत. तर पन्नास जणांचा मृत्यू झाला आहे. आजही दोन जणांचा मृत्यू झाला. त्यात शहादा येथील नामदेव चौकातील 57 वर्षीय पुरुष, तर नंदुरबार येथील योगेश्वरी कौलनीतील 55 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

दरम्यान, आज 55 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. यात नंदुरबार शहरासह तालुक्यातील 41, तर शहादा तालुक्यातील 13 व तळोदा येथील एका रुगणाचा समावेश आहे.

आज दिवसभरात 8 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यात नंदुरबार तालुक्यातील 4, शहादा येथील 3 तर नवापूर येथील एकाचा समावेश आहे. दररोज वाढणारी आकडेवारी पाहता अजूनही 629 अहवाल प्रलंबित असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com