बनावट पीयुसी प्रमाणपत्र वितरीत करणार्‍यास अटक

बनावट पीयुसी प्रमाणपत्र वितरीत करणार्‍यास अटक

नंदुरबार - Nandurbar - प्रतिनिधी :

शिरपूर जि.धुळे येथे बनावट पीयुसी प्रमाणपत्र तयार करून नंदुरबार जिल्हयात वितरीत करुन शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप पावरा याचे शिरपूर येथे साई प्रसाद पीयुसी आहे. त्याचा क्रमांक एम.एच.07/डीएचएल असा दाखवला गेला आहे.

या ठिकाणी बेकायदेशीररित्या पीयुसी सेंटर चालवून वाहनाचे बनावट पीयुसी प्रमाणपत्र वितरीत करून तो नंदुरबारसह धुळे जिल्हयात वितरीत करुन शासनाची फसवणूक करत होता.

दि.30 सप्टेंबर रोजी अशाचप्रकारे त्याने बनावट पीयुसी प्रमाणपत्र तयार करुन वितरीत केले म्हणून सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी उत्तम लक्ष्मण जाधव रा.गोल्डसिटी (नंदुरबार) यांच्या फिर्यादीवरून, नंदुरबार पोलीस ठाण्यात दिलीप बासु पावरा रा.नटवाला (ता.शिरपूर जि.धुळे) याच्याविरुद्ध भादंवि कलम 420, 417, 471 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास सपोनि दिवटे करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com