प्रकाशा - Prakasha - वार्ताहर :

डंपर चालकाचे नियंत्रण सुटल्याने मासे घेण्यासाठी उभा असलेल्या तरुणाला धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना प्रकाशा येथील बसस्थानकावर घडली

याबाबत अधिक माहिती अशी की, आज संध्याकाळी सातच्या सुमारास प्रकाशा बस स्टँड चौफुलीवर व्यावल ता. निझर येथील चंद्रकांत सामुद्रे हा मासे घेण्यासाठी उभा होता.

महामार्ग असल्याने तेथून भरधाव वेगाने जाणाऱ्या एका डंपर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने मासे विकत घेण्यास आलेल्या तरुण चंद्रकांत सामुद्रे हा मोटर सायकलवर उभा असताना डंपरने जबरदस्त धडक दिली. यात तो जागीच गतप्राण झाला.

तो व्यावल ता. निझार येथील रहिवासी होता. तो सामुद्रे कुटुंबातील एकुलता मुलगा होता. चंद्रकांत यास दिड महिण्याचे बाळ आहे.

सदर चौफुली रस्त्यावर सायंकाळी वाहनांची आणि मासे विकत घेण्यासाठी फार मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. तसेच हा अर्धचंद्रकोर रस्ता असल्याने येथे रस्त्याचेकाम अपूर्ण असल्याने सातत्याने सतत एकेरी वाहतूक सुरू असते.

तरीही वाहन चालक भरधाव वेगाने वाहन चालवत असतात. वाहनवरचे नियंत्रण सुटत असल्याच्या घटना येथे वारंवार घडत असतात.

तरी मासे विक्रेत्याना पर्यायी जागा देन्याची मागणी होत आहे. चंद्रकांतचा अपघाती मृत्यू झाल्याने सामुद्रे कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.