टेम्पोच्या धडकेत नंदुरबार येथील दोघे युवकांचा मृत्यु

टेम्पोच्या धडकेत नंदुरबार येथील दोघे युवकांचा मृत्यु

नंदुरबार - Nandurbar - प्रतिनिधी : पिककपची दुचाकीला धडक ;दोघे ठार

दोंडाईचा रस्त्यावर भरधाव वेगाने जाणाऱ्या पिकअप वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने वावद गावाजवळ घडलेल्या अपघातात नंदुरबारातील दोघे ठार झाल्याची घटना घडली.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काल सायंकाळी पिकप वाहन क्रमांक (MH-28-H-2514) नंदुरबार हुन दोंडाईचाकडे जात होती.

यावेळी दोंडाईचाहुन नंदुरबार कडे येत असलेली दुचाकी क्रमांक (MH-39-Q-6340) ला पिकअपने धडक दिली. घडलेल्या अपघातात दुचाकीवरील अश्विन प्रकाश सोनार (वय- 35, राहणार देसाई पुरा) तसेच सागर सुधाकर सोनार (वय 35 राहणार बाबा गणपती परिसर,नंदुरबार) सोनार गल्ली नंदुरबार हे दोघे जागीच ठार झाले.

दरम्यान पिकप वाहन चालक वाहन सोडून घटनास्थळाहून पसार झाला आहे।याबाबत मयताचे भाऊ आनंद प्रकाश सोनार यांच्या फिर्यादीवरून पिकअप वाहन चालक विरोधात कलम 304(अ), 279,337, 338,427 मोटार वाहन कायदा कलम प्रमाणे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक चौधरी करीत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com