शहादा : पिंपरी येथे पैशांच्या वादातून एकाचा खून
नंदुरबार

शहादा : पिंपरी येथे पैशांच्या वादातून एकाचा खून

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

शहादा - Nandurbar - Shahada :

तालुक्यातील पिंपरी येथे उसाच्या शेतात धारदार शस्त्राने वार करून एकाचा खून झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शहादा पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिस सुत्रांनी मिळालेल्या माहितीनुसार 10 जुलै रोजी पिंपरी येथे रमण सोमजी पाटील यांच्या उसाच्या शेतात चंद्रसिंग दामू मोरे (वय 45) हा मयत स्थितीत आढळून आला होता.

घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी सिताराम गायकवाड, पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी भेट देऊन पंचनामा केला होता. प्रथमदर्शनी अकस्मात मृत्यू म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला होता. मयत चंद्रसिंग मोरे यांच्या शरीरावर जखमा कसल्या आहेत, याबाबात तपास केल्यानंतर त्यात चंद्रसिंग मोरे यांचा खून झाल्याचे निषन्न झाले.

सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांनी हा तपास केला. त्यानंतर विष्णू चंद्रसिंग मोरे यांच्या फिर्यादीवरून याप्रकरणी वनसिंग काल्या पवार व ओंकार नारायण सोनवणे यांच्याविरुद्ध भादंवि कलम 302 अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com