रजाळे येथे मारहाणीत एकाचा खून

दोघा संशयितांना अटक
रजाळे येथे मारहाणीत एकाचा खून

नंदुरबार । प्रतिनिधी- Nandurbar

तालुक्यातील रजाळे येथे एकास बेदम मारहाण करुन खून केल्याची घटना घडली. याप्रकरणी दोघा संशयितांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार तालुक्यातील रजाळे येथील रामचंद्र पितांबर पाटील हे त्यांच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत नेहमी शिवीगाळ करुन मारहाण करीत होते. या कारणावरुन समाधान पोपट देवरे यांनी रामचंद्र पाटील यांना लाकडी काठीने कपाळावर, पाठीवर, दोन्ही हाताच्या दंडावर बेदम मारहाण केली.

तसेच शिवा वेडू गायकवाड याने हाताबुक्यांनी छातीवर, पोटावर बेदम मारहाण केल्याने गंभीर दुखापत झाल्याने रामचंद्र पाटील यांचा मृत्यू झाला. याबाबत पितांबर महारु पाटील यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात दोघा संशयितांविरोधात भादंवि कलम 302, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, पोलिसांनी संशयित समाधान देवरे व शिवा गायकवाड दोघे रा.रामबोरीस ता.धुळे यांना अटक केली असून पुढील तपास पोलिस निरीक्षक अरविंद पाटील करीत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com