पाणी भरण्याच्या वादातुन युवकाचा खून

गणेश बुधावल येथील घटना, दोघांना अटक
पाणी पुरवठा
पाणी पुरवठा

मोदलपाडा ता.तळोदा | वार्ताहर- NANDURBAR

गणेश बुधावल ता.तळोदा येथे सार्वजनिक हातपंपावर रात्री पाणी भरण्यासाठी गेल्याच्या रागातुन युवकाचा खुन करण्यात आल्याची घटना घडली आहे.याप्रकरणी तळोदा पोलीस ठाण्यात दोघांविरूध्द गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तळोदा तालुक्यातील गणेश बुधावल गावामधील महेंद्र शिड्या पाडवी हे दि.२८ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजता त्यांच्या घराजवळच असलेल्या सार्वजनिक हँडपंम्प वर पाणी भरण्यासाठी गेले असता अजय वळवी याने त्यांना पाणी भरण्यास गेट बंद करून विरोध केला व तुम्ही रात्रभर झोपू देत नाही.तुम्हाला मारून टाकू अश्या धमक्या दिल्या

व आई बहिनी वरून शिवीगाळ करत असतांना अजय वळवी, महीपाल रामजी वळवी या दोघांनी संगनमत करून मारहाणीस सुरवात केली. फिर्यादी महेंद्र पाडवी यांचा मुलगा अक्षय पाडवी हा तेथे आला असता अजय वळवी याने त्याच्या हातातील उलट्या कुर्‍हाडीच्या दांड्याने त्याच्या पोटावर जोरात ठोसा मारून गंभीर दुखापत करून अक्षय महेंद्र पाडवी (२०) रा. गणेश बुधावल ता.तळोदा याला जीवेठार मारले

.याप्रकरणी महेंद्र शिड्या वळवी यांच्या फिर्यादीवरून तळोदा पोलीस ठाण्यात अजय महीपाल वळवी, महीपाल रामजी वळवी रा.गणेश बुधावल ता.तळोदा यांच्या विरूध्द भादवि कलम ३०२, ३४१, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी पुढील तपास सपोनी अविनाश केदार करीत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com