नंदुरबार | प्रतिनिधी- NANDURBAR

मुखमंत्री सौर कृषी पंप योजनेअंतर्गत महावितरण कार्यालयाला वनविभाग काकरदा यांचा ना हरकत दाखला देण्यासाठी संबंधीतांकडून दीड हजार रुपयांची लाच स्विकारणार्या वनपालाला रंगेहाथ अटक करण्यात आली.

याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदारांच्या कुटुंबांची कंज्यापाणी येथे वनजमीन असून तेथे विहिर खोदलेली आहे. मुखमंत्री सौर कृषी पंप योजने अंतर्गत महावितरण कार्यालयाला वनविभाग काकरदा यांचा ना हरकत दाखला आवश्यक असतो.

सदर दाखला मिळण्यासाठी तक्रारदारांनी १५ फेब्रुवारी २०२१ रोजी काकरदा कार्यालयात अर्ज केला होता. त्याप्रमाणे सदर दाखला देण्यासाठी यातील आरोपी लोकसेवक वनपाल रानुदास ममराज जाधव यांनी तक्रारदारांकडे २ हजाराची लाचेची मागणी केली.

पंच व साक्षीदारांच्या समक्ष करून तडजोडी अंती १५०० ची लाच पंच व साक्षीदार यांच्या समक्ष शहादा बस स्टँड समोरील बंगलोर बेकरी समोर रोडवर वनपाल जाधव यांनी स्विकारली. म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक जयपाल अहिररराव, सहाय्यक सापळा अधिकारी पोलीस उप अधीक्षक शिरीष जाधव, हेकॉ महाजन, पोलीस नाईक दीपक चित्ते, संदीप नावडेकर, अमोल मराठे, मनोज अहिरे, महिला पोलीस नाईक ज्योती पाटील यांच्या पथकाने केली.