खासदारांनी योजनेचे श्रेय घ्यावे पण, यापूर्वीच १०५ घरकुले मंजूर
USER

खासदारांनी योजनेचे श्रेय घ्यावे पण, यापूर्वीच १०५ घरकुले मंजूर

नंदुरबारातच कमी घरकुले कसे ; माजी आ. चंद्रकांत रघुवंशी यांचा सवाल

नंदुरबार | प्रतिनिधी NANDURBAR

खासदारांनी पंतप्रधान आवास योजनेचे जरुर श्रेय घ्यावे.पण, मागील वर्षीच नंदुरबार नगरपालिकेच्या १०५ घरकुलांचे प्रस्ताव शासनाने मंजूर केले आहेत. शहादा, तळोदा पेक्षा नंदुरबारात कमी घरकुले मंजूर का झाली असा सवाल शिवसेनेचे नेते, माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी केला आहे.

नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील पालिका क्षेत्रामध्ये २ हजार ९१ घरकुलांना केंद्र शासनाने मंजुरी दिली. बेघरांसाठी घरकुले आपल्या पाठपुराव्यामुळे मंजूर झाल्याच्या दावा खा.डॉ हिना गावित यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला होता. त्यावर आज माजी आ. चंद्रकांत रघुवंशी Former MLA Chandrakant Raghuvanshi यांनी सांगितले, मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात नंदुरबार नगरपालिकेने सर्व्हे करून पात्र १०५ लाभार्थ्यांची यादी शासनाकडे पाठवली होती. त्यास मंजुरीही मिळाली होती.

कॉंग्रेस सरकारच्या काळात इंदिरा गांधींच्या नावाने ‘इंदिरा गांधी आवास योजना’ Indira Gandhi Awas Yojana राबविण्यात आली होती. याचा अर्थ असा होत नाही की, कॉंग्रेसच्याच लोकप्रतिनिधीने योजना मंजूर केली. खा.डॉ.हिना गावित Dr. Hina Gavit यांनी योजनेचे श्रेय घ्यावे पण, पंतप्रधान आवास योजने अंतर्गत नंदुरबार पालिकेच्या १०५ पात्र लाभार्थ्यांची यादी यापूर्वीच मंजूर झालेली असल्याचे रघुवंशी म्हणाले.

पात्र लाभार्थ्यांची बैठक

नगरपरिषदेची पंतप्रधान आवास योजना लागू झाली आहे. ज्या नागरिकांची स्वतच्या मालकीची जागा शहरात आहे, अशा १०५ घरकुलांच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबीयांची छत्रपती शिवाजी महाराज मंदिराशेजारील डोममध्ये बैठक घेण्यात आली. यावेळी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी Former MLA Chandrakant Raghuvanshi यांनी उपस्थितांना योजनेची माहिती दिली. यावेळी मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे, पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील, नगरसेवक कुणाल वसावे,दीपक दिघे,फारुख मेमन आदी उपस्थित होते.

बांधकामाची परवानगी घ्यावी

योजनेच्या पात्र लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे सादर करुन घरकुल बांधकामासाठी नगरपरिषदेकडून रीतसर परवानगी घ्यावी. विनापरवानगी बांधकाम करू नये. पालिकेचे कर्मचारी नागरिकांना सहकार्य करतील. लाभार्थ्यांनी लवकर घरकुलाचे बांधकाम करावे असे आवाहन श्री.रघुवंशी यांनी केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com