नंदुरबार - Nandurbar - प्रतिनिधी :

खांडबारा ता.नवापूर येथील मिस हिना पाडवी हिला नाशिक येथे नुकत्याच पार पडलेल्या आर.ए.जी क्रिऐशन सीजन फोर या शोमध्ये मिस महाराष्ट्र-2020 हे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

हिना पाडवी हिने आय.डी.टी. इन्स्टिट्यूट, नाशिक येथे फॅशन डिझायनिंग डिप्लोमा करत असताना आपल्या मॉडेलिंग करिअरला सुरुवात केली.

याआधी तीने नाशिक येथे पार पडलेल्या फॅशन शोमध्ये फेवरेट सिक्रेट स्टारचा पहिला अवार्ड मिळविला. तसेच सिन्नर येथे बेस्ट अॅटीटुड ऑफ सिन्नर-2019 अवार्ड मिळविला.

नंदुरबार येथील सनशाईन ग्रुप आयोजित शोमध्ये मिस पापुलर ऑफ नंदुरबार-2019 अवार्ड मिळवला. त्यानंतर मिस्टर अँड मिस नाशिक या स्पर्धेत फस्ट रनर अप-2019 अवार्ड मिळवला.

नंदुरबार या ठिकाणी ड्रीम वॉक या शोमध्ये सेकंड रनर अप झाली. तसेच याच कार्यक्रमात बेस्ट वॉक सुध्दा अवार्ड मिळवला.

नाशिक येथे दि 25 डिसेंबर रोजी पार पडलेल्या या शोचे ऑर्गनाइजर गौरव वाघ व मॅनेजमेंट बबलू पाटील, कोशिश सिन्नर हा, गौरव चव्हाण होते.

या शोमध्ये जज म्हणून हीना सय्यद, सायली अरोले, संजना पाटील यांनी काम पाहिले. या कार्यक्रमात हिना पाडवी यांना मिस महाराष्ट्र-2020 हे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

मिस हीना हिला मॉडेलिंग व डिझायनिंग क्षेत्रात व अभिनय क्षेत्रात करियर करायचे आहे. हिना पाडवी यांना मिस महाराष्ट्र अवार्ड मिळाल्याबद्दल अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.