केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कडून रस्ते कामासाठी १० कोटी रू.मंजूर

आमदार राजेश पाडवी यांच्या प्रयत्नांना यश
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कडून रस्ते कामासाठी १० कोटी रू.मंजूर

बोरद | वार्ताहर- nandurbar

तळोदा- शहादा मतदार संघाचे आमदार याच्या प्रयत्नाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी याच्याकडून १० कोटी रू सी.आर.एफ मधून रस्त्याच्या कामासाठी करून आल्याने तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी आ.राजेश पाडवी व ना.नितीन गडकरी यांचे आभार व्यक्त केले आहे.

आ.राजेश पाडवी यांनी शहादा तालुक्यातील कुसुमवाडा ते नांदे व तळोदा तालुक्यातील सोमावल बु ते नर्मदानगर या रस्त्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे दि.२० ऑक्टोंबर २०२० रोजी मजबुती व डांबरीकरणासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशा मागणीचे पत्र स्वतः भेटून दिले होते.

व त्याची दखल राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी घेतली, व लेगच भारत सरकारचे सडक परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची भेट आ.राजेश पाडवी याच्या समवेत घेवून या दोन्ही रस्त्यासाठी व शहादा तालुक्यातील नांदे, कुसुमवाडा,चिखली,धुरखेडा, लांबोळा रस्ता शहादा तालुक्यातील गावांसाठी सी.आर.एफ. मधून मंजूर करण्यात आले तर तळोदा तालुक्यातील एन.एच ७५३ (इ) सोमावल ते नर्मदा नगर या ४४ किमी रस्त्यासाठी १० कोटी मंजूर करून मंजुरीचे पत्र आ.राजेश पाडवी यांना पाठविण्यात आले.

त्यामुळे एका महत्वाच्या कामाला सुरुवात होणार आहे, या गावातील नागरिकांची व शेतकर्‍याची अनेक वर्षांपासूनची मागणी होती.ती मागणी आ.राजेश पाडवी याच्या प्रयत्नाने मजुरी मिळाल्याने दोन्ही तालुक्यातील नागरिकांनी आ.राजेश पाडवी याचे आभार व्यक्त केले आहेत. तर आ.पाडवी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचे आभार व्यक्त केले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com