नंदुरबार जिल्हाधिकारीपदी मनीषा खत्री

डॉ. राजेंद्र भारूड यांची पुण्याला बदली
नंदुरबार जिल्हाधिकारीपदी मनीषा खत्री
जिल्हाधिकारी मनीषा खत्रीCollector Manisha Khatri

नंदुरबार - Nandurbar - प्रतिनिधी :

येथील जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांची पुणे येथील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या आयुक्तपदी नियुक्ती झाली असून त्यांच्या जागी जिल्हाधिकारी म्हणून मनीषा खत्री यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

डॉ. राजेंद्र भारूड
डॉ. राजेंद्र भारूडDr Rajendra Bharud

2013 च्या बॅचचे आय.ए.एस.अधिकारी असलेले डॉ. भारुड हे गेल्या दोन वर्षापासून नंदुरबार जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते.

त्यांची पुणे येथील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या आयुक्तपदी बदली झाली आहे. त्यांच्या जागी नागपूर येथील आदिवासी विकास विभागाचा अतिरिक्त आयुक्त श्रीमती मनीषा खत्री यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

श्रीमती खत्री या 2014 च्या बॅचच्या आय.ए.एस. अधिकारी आहेत. लवकरच त्या आपल्या पदाचा कार्यभार सांभाळतील.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com