रायपूर जवळ मालेगाव-बडोदा बस उलटली

पाच प्रवासी जखमी, नवापूर उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरू
रायपूर जवळ मालेगाव-बडोदा बस उलटली

नवापूर-प्रतिनिधी Navapur

नवापुर तालुक्यातील रायपूर जवळ (Gujarat) गुजरात राज्याची मालेगाव बडोदा (Malegaon Baroda) बसचा अपघात झाला आहे. या अपघातात चार प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

गुजरात राज्याची (बस क्र.जी.जे.18, झेड 6858) ही मालेगाव होऊन बडोद्याला जात असताना, नवापुर तालुक्यातील चरणमाळ घाटात चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने पलटी झाली या बसमध्ये वीस ते बावीस प्रवासी प्रवास करीत होते.

या अपघातात चार प्रवासी जखमी असल्याचं प्राथमिक माहिती मिळाले आहे. जखमींना नवापूर उपजिल्हा रुग्णालय उपचारासाठी दाखल करण्यात आल आहे. घटनेची माहिती कळताच आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी बसमधील प्रवाशांना बस बाहेर काढण्यासाठी सहकार्य केलं.

घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी नवापुर (Police) पोलीस विभागाचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर, उपनिरीक्षक नासीर पठाण पोलीस हेड कॉन्स्टेबल विकी वाघ आदींचे पथक उपस्थित होते.त्यांनी प्रवाशांना मदत कार्य केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com