नवापूर येथे ११ लाखांची दारु जप्त

नवापूर येथे ११ लाखांची दारु जप्त

नवापूर - Navapur - श.प्र :

तालुक्यातील लक्कडकोट रस्त्यावरून विनापरवाना वाहतूक होणारी तब्बल ११ लाख ७ हजार ४२० रुपये किमतीची देशीविदेशी दारु पोलीसांनी जप्त केली आहे. याप्रकरणी दोन संशयितांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज दि.१८ मे रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास नवापूर-लक्कडकोट रस्त्यावरील कारेघाट जंगलात एक लाल रंगाचा टेम्पो (क्र.एम.एच.३९ ए.बी.०८८३) अवैधरित्या विनापास देशी व विदेशी दारू, बिअर महाराष्ट्र राज्यातून गुजरात राज्यात घेऊन जात असताना नवापूर पोलिसांनी पकडला.

सदर टेम्पोमधील दारू पोलीस ठाण्यात जप्त करण्यात आली आहे. त्यात ११ लाख ७ हजार ४२० रुपयांची देशी-विदेशी व बियरचा साठा मिळून आला. ८ लाखाच्या टेम्पोसह एकुण १९ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई नवापूर पोलीस ठाण्यातील निरीक्षक बाळासाहेब भापकर, पोलीस उपनिरीक्षक नासीर पठाण, गुमानसिंग पाडवी, प्रविण मोरे आदींनी केली आहे. यासंदर्भात दोन संशयित आरोपींना नवापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com