जिल्हयातील अनुसूचित क्षेत्राबाहेरील ७६ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची २९ जानेवारीला आरक्षण सोडत

४ फेब्रुवारीला महिला आरक्षण सोडत
जिल्हयातील अनुसूचित क्षेत्राबाहेरील ७६ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची २९ जानेवारीला आरक्षण सोडत
USER

नंदुरबार | प्रतिनिधी NANDURBAR

नंदुरबार जिल्ह्यातील अनुसूचित क्षेत्राबाहेर येणार्‍या शहादा तालुक्यातील ३५ व नंदुरबार तालुक्यातील ४१ अशा एकुण ७६ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत तालुकास्तरावर २९ जानेवारी रोजी शहादा व नंदुरबार तहसिल कार्यालयात काढण्यात येणार आहे.

तर ५९५ ग्रामपंचायतींमधील महिला सरपंच पदाची आरक्षण सोडत ४ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बिरसामुंडा सभागृहात काढण्यात येणार आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील अनुसूचित क्षेत्रात समाविष्ट असलेल्या एकुण ५१९ ग्रामपंचायती व अनुसूचित क्षेत्राबाहेरील ७६ ग्रामपंचायती अशा एकूण ५९५ ग्रामपंचायतींमधील महिला सरपंच पदाची आरक्षण सोडत ४ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार येथील बिरसामुंडा सभागृहात काढण्यात येणार आहे.

सदर आरक्षण हे १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२५ या पाच वर्षाच्या कालावधीत सार्वत्रिक निवडणूका होऊन गठित होणार्‍या ग्रामपंचायतीसाठी लागू राहणार आहे.

कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर सदर आरक्षण काढतांना घेण्यात येणार्‍या सभेत सार्वजनिक आरोग्य विभाग व मदत व पुर्नवसन विभाग तसेच जिल्हाधिकारी नंदुरबार यांनी वेळोवेळी दिलेल्या आरोग्यविषयक सुचना व आदर्श कार्यप्रणाली संहिता या बाबींचे पालन होण्याबाबत कटाक्षाने काळजी घेण्यात यावी, असे आवाहन उपजिल्हाधिकारी बबन काकडे यांनी केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com