आ.पाडवी यांच्या वाढदिवसानिमित्त 51 जणांचे रक्तदान

आ.पाडवी यांच्या वाढदिवसानिमित्त 51 जणांचे रक्तदान

खेतिया - Khetiya - वार्ताहर :

शहादा येथील आमदार कार्यालयात आ. राजेश पाडवी यांच्या वाढदिवसानिमित्त मित्र परिवारातर्फे रक्तदान शिबीर घेण्यात आले. यावेळी 51 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

यावेळी आ.राजेश पाडवी म्हणाले,1 मे नंतर 18 वर्षावरील सर्व नागरिकांचे लसीकरण होणार असून लसीकरण झाल्यानंतर, 2 ते 3 महिने आपल्याला रक्तदान करता येत नाही.

यामुळे देशात रक्तचा खूप मोठा तुटवडा निर्माण होऊ शकतो आणि आपण एका मोठ्या संकटात सापडू शकतो. दुर्दैवाची गोष्ट आहे. मात्र सत्य की रक्ताचा कुठे कारखाना नाही, कुठली प्रयोगशाळा नाही, रक्त निर्माण करणारा एकमेव कुठला कारखाना असेल ते हे मानवी शरीर आहे.

देशाच्या सीमेवर जाऊन देशाचं रक्षण करणं सगळ्यांचा वाट्याला येत नाही. त्यानंतर सगळ्यात पुण्यकर्म कुठलं असेल तर ते रक्तदान आहे.

रक्तदान ही काळाची गरज आहे. आज देशावरील कोरोनासारख्या महाभयंकर रोगांमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रक्ताचा तुटवडा निर्माण झाला.ही परिस्थिती सुधारण्यासाठी 51 रक्तदात्यांनी रक्तदान करून राष्ट्रीय कार्य केले. सर्व रक्तदात्यांचे आ.राजेश पाडवी यांनी अभिनंदन केले.

यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील, माजी जि.प सदस्य सुनिल चव्हाण, विजय पाटील, जिल्हा सरचिटणीस निलेश माळी, जिल्हा उपाध्यक्ष मकरंद पाटील, प्रदेश सदस्य डॉ.किशोर पाटील, आदिवासी मोर्चा जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत वसावे, तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, शहराध्यक्ष विनोद जैन, जिल्हा उपाध्यक्ष दंगल सोनवणे, जिल्हा सचिव नारायण ठाकरे, उपसरपंच डॉ.विजय चौधरी, माजी जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र जमदाडे, दिनेश खंडेलवाल, अतुल जयस्वाल, गोपाल गांगुर्डे, गोपाल पावरा, जयेश देसाई, पंकज सोनार, हितेंद्र वर्मा, झुलाल मालचे, सुनिल सुळे, गोविंद पटले, गोपी पावरा, प्रविण वळवी, कल्पेश पाटील, कमलेश जांगिड, राजू देसाई, नंदा सोनवणे, भावना लोहारा, मोतीभाई चोरडिया, ललित छाजेड, दीपक जयस्वाल, प्रितम निकुम, योगेश अहिरे आदी उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com