खान्देश एक्स्प्रेस व हापा- बिलासपूर एक्स्प्रेस ९ मे पासून बंद

खान्देश एक्स्प्रेस व हापा- बिलासपूर एक्स्प्रेस ९ मे पासून बंद

नंदुरबार - Nandurbar - प्रतिनिधी :

पश्चिम रेल्वेने दि. ९ मे पासून बांद्रा-भुसावळ खानदेश एक्सप्रेस तसेच हापा-बिलासपूर एक्सप्रेस अनिश्चित काळासाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

करोनामुळे सध्या लॉकडाऊन असल्याने प्रवाशांची संख्या घटली आहे. त्यातच एसटी महामंडळाच्या बसेस बंद असल्यामुळे रेल्वे हा एकच पर्याय आहे प्रवाशांकडे आहे.

परंतु सद्यस्थितीत रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्यादेखील मोठ्या प्रमाणावर घटली असल्यामुळे पश्चिम रेल्वेने दि. 9 मे पासून बांद्रा-भुसावळ खानदेश एक्सप्रेस आणि हापा बिलासपूर एक्स्प्रेस अनिश्चित काळासाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबईला जाणाऱ्या व तेथून येणाऱ्या खानदेशवासियांची गैरसोय होणार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com