छायाचित्र दिनानिमित्त डॉ.भारती पवारांनीच काढले छायाचित्रकारांचे फोटो

छायाचित्र दिनानिमित्त डॉ.भारती पवारांनीच काढले छायाचित्रकारांचे फोटो
bharati pawar

नंदुरबार

केंद्रीय मंत्री डॉ.भारती पवार (dr bharati pawar) यांचा जन आशीर्वाद (jan surajya yatra)यात्रेनिमित्त नंदुरबार दौरा गुरुवारी छायाचित्रकारांसाठी चांगलाच लक्षात राहिला. जागतिक छायाचित्र दिनानिमित्त (world photography day) डॉ.पवारांनी स्वत:च कॅमेरा हातात घेत छायाचित्रकारांचे फोटो काढत त्यांना आगळ्यावेगळ्या शुभेच्छा दिल्या.

bharati pawar
bharati pawar

नंदुरबार जिल्ह्यात जन आशीर्वाद यात्रेच्या (jan surajya yatra)निमित्त दौऱ्यावर असताना केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार (dr bharati pawar) यांनी छायाचित्रकारांना जागतिक छायाचित्र दिनानिमित्त (world photography day) शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांचे फोटो काढणाऱ्या छायाचित्राकारांकडून कॅमेरा डॉक्टर भारती पवार (dr bharati pawar) यांनी घेतला आणि स्वत:च त्यांचे फोटो काढायला लागल्या.

bharati pawar
bharati pawar

छायाचित्रकारांच्या झालेल्या या सन्मानाबद्दल सर्व छायाचित्रकारांनी राज्यमंत्री महोदयांचे आभार मानले. याप्रसंगी खा.डॉ.हिनाताई गावित छायाचित्रकार बंधू, आदिवासी मोर्चा प्रदेशाध्यक्ष डॉक्टर अशोक उईके, भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, विलास रघुवंशी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com