मोनिका मीणा यांना आंतरराष्ट्रीय ग्लोरी अ‍ॅवॉर्ड

मोनिका मीणा यांना आंतरराष्ट्रीय ग्लोरी अ‍ॅवॉर्ड

नंदुरबार Nandurbar। प्रतिनिधी-

नंदुरबार तालुका विधायक समितीच्या विधी महाविद्यालयातील College of Law भूतपूर्व प्रा.अ‍ॅड. मोनिका मीना Prof.Add. Monica Meena यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर International level उल्लेखनीय काम केले म्हणून वुमन ऑफ सबस्तन्स Woman of Substance या आंतरराष्ट्रीय ग्लोरी अवॉर्डने International Glory Awards सन्मानित करण्यात आले.

गोवा येथील हॉटेल पार्क रेगिस येथे काल हा कार्यक्रम झाला. सोनू सूद यांच्या हस्ते श्रीमती मोनिका यांना हा पुरस्कार देण्यात आला. आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध क्षेत्रात काम करणार्‍या आणि यशस्वी ठरणार्‍याना हा पुरस्कार दिला जातो.

वि कनेक्ट स्टारने हा पुरस्कार दिला. एस.एन.एक्स. ने समारंभाचे आयोजन केले होते. देश-विदेशातील हजारो नामवंतांची यावेळी उपस्थिती होती. श्रीमती मीना यांच्या यशाबद्दल नंदुरबार तालुका विधायक समितीचे अध्यक्ष मनोज रघुवंशी, संचालक अ‍ॅड.राजेंद्र रघुवंशी, माजी आ. चंद्रकांत रघुवंशी, विधी महाविद्यालयाचे प्राचार्य एन.डी. चौधरी आदींनी समाधान व्यक्त केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com