आरोग्य कर्मचार्‍यांचे जि.प.समोर 23 पासून बेमुदत धरणे आंदोलन

आरोग्य कर्मचार्‍यांचे जि.प.समोर 23 पासून बेमुदत धरणे आंदोलन

नंदुरबार Nandurbar । प्रतिनिधी

पदोन्नती व कालबद्ध पदोन्नतीचा promotion प्रत्यक्ष लाभ मिळावा यासाठी जिल्ह्यातील सर्व आरोग्य कर्मचारी health workers दि. 23 ऑगस्ट पासून जिल्हा परिषदेसमोर बेमुदत धरणे आंदोलन agitation करतील अशी नोटीस आरोग्य कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष हर्षल मराठे Hershal Marathe, President of the Federation of Health Workers यांनी प्रशासनाला दिली.

2009 पासून म्हणजे तब्बल 1 तपापासून जिल्हा परिषद आरोग्य कर्मचार्‍यांना कालबद्ध पदोन्नतीचा व पदोन्नतीचा लाभ देण्यात आलेला नाही. अशाप्रकारे गेल्या 12 वर्षांपासून आरोग्य कर्मचार्‍यांचे सामाजिक व आर्थिक शोषण जि. प. प्रशासनाकडून करण्यात येत आहे. खासदार डॉ हिनाताई गावित यांच्या नेतृत्वाखाली व आदिवासी सेवक तथा महासंघाचे नेते डॉ कांतीलाल टाटिया यांच्या उपस्थितीत महासंघाच्या वतीने जि प मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांच्याशी त्यांच्या दालनात दि. 4 नोव्हेंबर 2020 रोजी चर्चा केली असता वरील दोन्ही मागण्या मंजूर करण्यात आल्या होत्या परंतु 9 महिन्यांपासून संबंधित अधिकार्‍यांना भेटून चर्चा करून, सतत पाठपुरावा करूनही कालबद्ध पदोन्नती व पदोन्नतीचा लाभ आरोग्य कर्मचार्‍यांना प्रत्यक्ष मिळालेला नाही.

या पार्श्वभूमीवर दि. 8 ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील सर्व संवर्गातील आरोग्य कर्मचार्‍यांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊन सभा घेतली व त्या सभेत अंतिम निर्णायक विजयी लढा देण्याचा निर्णय घेऊन 23 ऑगस्ट पासून जिल्हा परिषदेसमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्याच्या निर्णय घेतला. या आरपारच्या लढ्याच्या तयारीसाठी महासंघाचे अध्यक्ष हर्षल मराठे, राजू भाई, वाय पी गिरी, विशाल मोघे यांनी जिल्ह्यात दौरे करून मोठ्या प्रमाणात जनजागृती केली आहे. आंदोलनासाठी जिल्ह्यातून सर्व संवर्गातील आरोग्य कर्मचारी नर्सेस भगिनी शत प्रतिशत सहभागी होणार आहे. 12 वर्षांपासून आरोग्य कर्मचार्‍यांना न्याय न मिळाल्याने त्यांच्यामध्ये संतापाचे वातावरण असल्याने जिल्ह्यातील तमाम आरोग्य कर्मचारी 23 ऑगस्टच्या आंदोलनात नंदुरबार येथे हजर राहून अंतिम विजय मिळविल्याशिवाय माघारी फिरणार नसल्याने जिल्हा परिषद प्रशासनाने आरोग्य कर्मचारी आपल्या परिवारातीलच घटक असल्याने वेळकाढू व चालढकलपणा न करता त्यांना त्यांच्या हक्काचा प्रत्यक्ष लाभ देऊन न्याय द्यावा व कर्मचार्‍यांना नाइलाजास्तव आंदोलन करण्याची वेळ येऊ देऊ नये असे आवाहन डॉ कांतीलाल टाटीया यांनी केले.कालबद्ध पदोन्नती व पदोन्नतीच्या अंतिम निर्णायक लढ्यात मलेरिया कर्मचारीदेखील जि प कर्मचार्‍यांच्या खांद्याला खांदा लावून लढा देतील असे आरोग्य कर्मचारी महासंघाचे चिटणीस सतीश जाधव, निखील तुपे यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com