नंदुरबार । प्रतिनिधी Nandurbar

नंदुरबार जिल्ह्यात 150 जण कोरोनामुक्त झत्तल्याने त्यांना रूग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आला.दरम्यान आज पुन्हा कोरोनामुळे दोघांचा मृत्यू झाला तर दिवसभरात 5 जणांचा अहवाल हा कोरोना पॉझिटिव्ह आला.आतापर्यंत स्वॅब तपासणीचा आकडा 50 हजाराच्यावर गेला आहे.

नंदुरबार जिल्ह्यात आज 150 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रूग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आला.यात नंदुरबार तालुक्यातील 64, शहादा तालुक्यातील 69, तळोदा तालुक्यातील 13, अक्कलकुवा तालुक्यातील 2 व धडगांव व नवापूर तालुक्यातील प्रत्येकी 1 चा समावेश आहे.

दरम्यान आज तळोदा तालुक्यातील दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला यात मोदलपाडा येथील 48 वर्षीय व मोड येथील 62 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे.दरम्यान आज जिल्ह्यात 368 जणांचा अहवाल प्राप्त झाला. यात 12 व्यक्तींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला.यात नंदुरबार तालुक्यातील 3.शहादा व धडगांव तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. सध्या 314 जणांवर कोविड कक्षात अपचार सुरू आहे.

नंदुरबार जिलह्यात आतापर्यंत 50 हजार 614 जणांचा स्वॅब धेण्यात आला आहे.यात 40 हजार 890 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असुन 8 हजार 31 जण कोरोनामुक्त झाले आहेत.