नंदुरबार । प्रतिनिधी- Jalgaon

जिल्ह्यात आज 94 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रूग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आला.

यात नंदुरबार तालुक्यातील 45, शहादा तालुक्यातील 25, अक्कलकुवा तालुक्यातील 7,नवापूर तालुक्यातील 2,तळोदा तालुक्यातील 15 जणांचा समावेश आहे. आतापर्यत जिल्ह्यात 9 हजार 94 कोरोना रूग्ण आढळुन आले आहेत. यातुन 8 हजार 766 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

यात नंदुरबार तालुक्यातील 3 हजार 355, शहादा तालुक्यातील 3 हजार 486, अक्कलकुवा तालुक्यातील 272 ,नवापूर तालुक्यातील 745, तळोदा तालुक्यातील 811, धडगांव तालुक्यातील 97 जणांचा समावेश आहे.

आतापर्यंत 215 जणांचा कोरानामुळे मृत्यू झाला.तर 110 जणांवर कोविड कक्षात उपचार सुरू आहे.