नंदुरबार । प्रतिनिधी Nandurbar

नंदुरबार जिल्ह्यात आज 52 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. दरम्यान आज 188 जणांचे अहवाल प्राप्त झाले. यात 27 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला.

नंदुरबार जिल्ह्यात 1 जानेवारीपासून कोरोना रूग्णांच्या संख्येमध्ये वाढ होतांना दिसत आहे. त्यातच आज नंदुरबार जिल्ह्यातील 52 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यात नंदुरबार तालुक्यातील 24, शहादा तालुक्यातील 22 तर तळोदा तालुक्यातील 6 जणांचा समावेश आहे.

दरम्यान आज 188 जणांचा अहवाल प्राप्त झाला. यात 27 व्यक्तींचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले. यात नंदुरबार तालुक्यातील 16, शहादा तालुक्यातील दोन, नवापूर तालुक्यातील दोन, तळोदा तालुक्यातील 5, धडगांव तालुक्यातील दोन जणांचा समावेश आहे.

आतापर्यंत नंदुरबार तालुक्यात 3 हजार 278, शहादा तालुक्यात 3 हजार 407, तळोदा तालुक्यात 805, नवापूर तालुक्यात 753, अक्कलकुवा 263 तर धडगांव तालुक्यातील 77 जणांचा कोरोना अहवाल हा पॉझिटिव्ह आला आहे.