नंदुरबार : जिल्ह्यात दिवसभरात आढळले 27 रूग्ण
नंदुरबार

नंदुरबार : जिल्ह्यात दिवसभरात आढळले 27 रूग्ण

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

नंदुरबार - Nandurbar - प्रतिनिधी :

जिल्ह्यात आज तब्बल 27 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.यात नंदुरबार येथे 16,शहादा 7,तळोदा येथे 3 तर नवापूर येथे एका रूग्णांचा समावेश आहे.दरम्यान आज 11 रूग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.कोरोनामुळे मृतांची संख्या दोनने वाढली असून आतापर्यंत 24 जणांचा मृत्यू झाला आहे. काल रविवारी सकाळी नंदुरबार येथील एका 48 वर्षीय बाधित पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर एका महिलेचा मृत्यूनंतर आज पॉझिटीव्ह अहवाल आला आहे. यामुळे जिल्ह्यात बाधितांची संख्या 479 झाली असून संसर्गमुक्ताची संख्या 2098 आहे.

नंदुरबार जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आज दि.26 जुलै रोजी जिल्ह्यात तब्बल 27 रूग्ण जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यात नंदुरबार शहरात 16, शहाद्यात 7, तळोदा येथे 3, नवापूर येथे एकाचा समावेश आहे. यामध्ये नंदुरबार येथील स्वराज नगरमधील 55 वर्षीय पुरूष, तांबोळी गल्लीतील 36 वर्षीय पुरूष, गणेश नगर कोकणीहिल येथील 12 वर्षीय बालक, 41 वर्षीय पुरूष, देसाईपुरा येथील 60 वर्षीय पुरूष जुनी सिंधी कॉलनी येथील 32 वषी्रय महिला व 60 वर्षीय महिला अमृतचौक देसाईपुरा 60 वर्षीय पुरूष, शिरीष मेहतारोड 72 वर्षीय पुरूष, हिंगलाच माता मंदिर परिसर 33 वर्षीय पुरूष, पटेलवाडी 64 वर्षीय पुरूष, नंदुरबार 57 वर्षीय पुरूष, हाटदरवाजा 74 वर्षीय पुरूष, मोठा माळीवाडा 59 वर्षीय महिला, माळीवाडा 65 वर्षीय पुरूष तर शहादा येथील गरिब नवाज कॉलनी 58 वर्षीय पुरूष, साजरा चौक 70 वर्षीय महिला,विजय नगर 50वर्षीय पुरूष,शहादा 54 वर्षीय पुरूष,रामरहिम नगर 56 वर्षीय पुरूष,इंदुबाई नगर 48 वर्षीय महिला, खेतिया रोड 70 वर्षीय पुरूष तर तळोदा येथे ख्वाजा नाईक चौक 28 वर्षीय युवक,स्मारक चौक 16 वर्षीय युवक,श्रीराम नगर 48 वर्षीय पुरूष तर नवापूर येथील जनता पार्क येथील 36 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे.नंदुरबार शहरातील सराफ बाजारातील 48 वर्षीय पुरुष दि.24 जुलै रोजी रुग्णालयात दाखल झाला होता. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु आज रविवारी सकाळी कोरोना बाधित नंदुरबार येथील 48 वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच सायंकाळी पाच वाजेच्या अहवालात दोन जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यात नंदुरबार येथील सुयोग नगर देसाईपुरा या भागातील 66 वर्षीय वृद्ध महिलेचा शनिवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. परंतु या महिलेचा अहवाल आज रविवारी पॉझिटीव्ह प्राप्त झाला आहे.

दरम्यान आज जिल्ह्यात 11 जण कोरोना संसर्गमुक्त झाले. यात नंदुरबार येथील देसाईपुरा 70 वर्षीय महिला, श्रॉफ हायस्कुल 33 वर्षीय महिला, विमल हौसिंग 27 वर्षीय पुरूष, रायसिंगपुरा 19 वर्षीय महिला, रायसिंगपुरा 45 वर्षीय महिला, मोठा माळीवाडा 39 वर्षीय पुरूष, चौधरीगल्ली 60 वर्षीय महिला, रायसिंगपुरा 33 वर्षीय पुरूष, लोकमान्य कॉलनी 47 वर्षीय पुरूष, मुजावर मोहल्ला आणि पाटीलवाडी नंदुरबार हे कोरोना संसर्गमुक्त झाल्याने त्यांना रूग्णालयातून आज डिर्स्चाज देण्यात आला.

यामुळे जिल्ह्यात बाधितांची संख्या 479 झाली असून संसर्गमुक्ताची संख्या 2098 आहे. तर नंदुरबार जिल्ह्यात आतापर्यंत 24 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

Deshdoot
www.deshdoot.com