कुपोषणाला हद्दपार करण्यासाठी प्रभावी योजना राबविणार

कुपोषणाला हद्दपार करण्यासाठी प्रभावी योजना राबविणार

नंदुरबार Nandurbar । प्रतिनिधी-

जिल्हयातील कुपोषणाला Malnutrition हद्दपार करण्यासाठी विविध योजना प्रभावीपणे राबविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे केंद्रीय आरोग्य व कुटूंब कल्याण राज्यमंत्री ना.डॉ.भारती पवार Union Minister of State for Health and Family Welfare Dr. Bharti Pawar यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

ना.डॉ.भारती पवार या काल दि. 18 ऑगस्ट रोजी सायंकाळपासून त्यांच्या जनआशीर्वाद यात्रेनिमित्त नंदुरबार जिल्हा दौर्‍यावर आहेत. आज दुपारी जिल्हा रुग्णालयाला भेट दिल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत डॉ.पवार बोलत होत्या.

ना.डॉ.पवार म्हणाल्या, जिल्ह्यात कुपोषणाचे प्रमाण वाढले असले तरी स्क्रिनिंगमुळे सदरची संख्या वाढली असल्याचे दिसून येत आहे. गेल्या दोन वर्षाच्या तुलनेत कुपोषणाच्या संख्येत घट झाली आहे. स्क्रिनिंगपासून वंचित असणार्‍या बालकांचा शोध घेवून स्क्रिनिंग करण्याच्या सूचना संबंधित विभागाला देण्यात येणार आहे. कुपोषणाला 100 टक्के हद्दपार करण्यासाठी दर्जेदार पोषण आहार पुरविण्यासाठी संबंधित यंत्रणांना सूचना देण्यात आल्या आहेत.

ना.डॉ.पवार म्हणाल्या, नंदुरबार जिल्ह्यात आल्यावर माहेरात आल्यासारखे वाटत असून मनापासून आनंद होतो. भाजपातर्फे जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. खरे तर जनतेत गेल्याशिवाय जनतेचे प्रश्न समजणार नाहीत. यामुळे घरात बसून टीका करणार्‍यांनी राजकारण करु नये.

नंदुरबार जिल्ह्यात 5 लाखाचा लसीकरणाचा टप्पा पूर्ण करण्यात आला आहे. कोरोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेसंदर्भात आढावा घेतला असून आवश्यक त्या सूचना संबंधित विभागांना दिल्या आहेत. यामुळे सतर्कता बाळगणे आवश्यक आहे.

जिल्ह्यात केंद्राकडून आलेला पैसा पडून आहे. एका बाजूला केंद्र सरकार मदत करत नसल्याची ओरड केली जाते तर दुसर्‍या बाजूला मिळालेला पैसा देखील खर्च होत नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त करत याचा जाब विचारणार असल्याचे सांगितले. आगामी काळामध्ये नंदुरबार जिल्ह्यात केंद्राच्या विविध योजनांचा लाभ पोहचविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे ना.डॉ.पवार यांनी सांगितले.

यावेळी खा.डॉ.हीना गावित, जिल्हाध्यक्ष विजय चौधरी आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com