शहादा येथे मिरवणुका न काढता गणपतीचे विसर्जन

शहादा येथे मिरवणुका न काढता गणपतीचे विसर्जन

शहादा shahada। ता.प्र.

पहिल्या टप्प्यातील गणेश विसर्जन (Immersion of Ganapati) आज रोजी उशिरापर्यंत संपन्न झाले गणेश भक्तांनी कोणत्याही प्रकारच्या मिरवणुका न काढता विसर्जन केले.यासाठी नगरपालिका प्रशासनातर्फे (Municipal administration) कृत्रिम तलाव (Artificial lake) तयार करण्यात आले होते.

कोरोनामुळे सतत दुसर्‍यावर्षी कोणत्याही प्रकारच्या मिरवणुका काढता आल्या नाहीत प्रशासनाने निर्बंध लावण्यात आलेले आहेत.कोरोनाच्या दुसर्‍या लाटेनंतर काहीसा दिलासा मिळाल्याने गणेश भक्तांनी व विविध मंडळांनी गणेश मूर्तींची स्थापना करण्यात उत्साह दाखवला होता.विशेष म्हणजे शहरात चार फुटांपेक्षा मोठी मूर्ती कोणत्याही मंडळाने आणली नसल्याने कौतुक करण्यात आले घरोघरी गणरायाची स्थापना केली होती.

शहरात नगरपालिकेतर्फे सात ते आठ ठिकाणी गणेश मुर्त्यांची संकलन करण्यासाठी व्यवस्था केलेली होती मंडप टाकण्यात आले होते नगरपालिका प्रशासनाने सगळ्या मुर्त्या एकत्रित संकलित करून विधीवत धार्मिक पूजा विधी करून विसर्जन केले. गणेश विसर्जन करण्यासाठी नगरपालिका प्रशासनाने प्रेस मारुती मैदान व पालिकेच्या माध्यमिक हायस्कूलच्या मैदानात दोन मोठे कृत्रिम तलाव तयार करण्यात आले होते.

त्याच तलावांमध्ये अनेक गणेश भक्तांनी गणेश विसर्जन केले.पालिकेचे अधिकारी कर्मचारी पोलीस कर्मचारी उपस्थित होते डी.वाय.एस.पी.श्रीकांत घुमरे.पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत.नूतन मुख्याअधिकारी दिनेश सिनारे हे स्वतः गस्त घालीत होते नगराध्यक्ष मोतीलाल पाटील गटनेते मकरंद पाटील जिल्हा परिषद माजी कृषी सभापती अभिजीत पाटील यांनी गणेशभक्तांचे कौतुक केले.

शहादा शहराला लागून गोमाई नदीला पूर आल्यानंतर सध्या पात्रात चांगले पाणी असल्याने गणेश भक्तांनी जास्तीत जास्त गोमाई नदीच्या पात्रात गणेश विसर्जन करण्याकडे कल दिसून आला.त्यामुळे कृत्रिम तलावात गणेश विसर्जन करण्याची संख्या कमी होती.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com