नंदुरबारात साकारली रांगोळीतुन लालबागच्या राजाची प्रतिमा

56 तास परिश्रम करत 20 किलो रांगोळीचा वापर
नंदुरबारात साकारली रांगोळीतुन लालबागच्या राजाची प्रतिमा

नंदुरबार Nandurbar। प्रतिनिधी

शहरात गौरव माळी (Gaurav Mali) या कलाकाराने 56 तासांच्या अथक परिश्रमानंतर गणेशचतुर्थीनिमित्त (Ganesh Chaturthi) लालबागच्या श्री गणरायाची (Ganarayachi of Lalbaug) 4 बाय 6 फुटाची प्रतिमा (Image) रांगोळीने (Rangoli) साकारलेली आहे.

नंदुरबार शहरातील गौरव माळी विद्यार्थ्याने 56 तासाच्या अथक परिश्रमानंतर Ganesh Chaturthiगणेशचतुर्थीनिमित्त लालबागच्या श्री गणरायाची 4 बाय 6 फुटाची रांगोळी प्रतिमा साकारलेली आहे. 15 ते 20 किलो रांगोळीचा वापर यात करण्यात आला असून विशेष पिगमेंट व लेक रंगांचा मिश्रण करण्यात आले होते. या रासायनिक रंग 120 रुपये 100ग्रॅम स्वरूपात मिळाले. मालेगाव येथील साई आर्ट संस्थेचे संचालक, प्रमोद आर्वी यांच्या मार्गदर्शनाखाली गौरव माळी या विद्यार्थ्याने प्रशिक्षण घेतले आहे. श्री गणरायाची 4 बाय 6 फुटाची रांगोळी प्रतिमा अदभूत असून ती डोळ्यांचे पारणे फेडणारी आहे. अशा प्रकारे अद्भूत रांगोळी प्रथमच साकारण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com