मोलगी शहर व परिसरात अवैध धंदे जोमात

 मोलगी शहर व परिसरात  अवैध धंदे जोमात

मोलगी (Molgi) ता.अक्कलकुवा । वार्ताहर

आदिवासी सांस्कृतिक ठेवा जपणार्‍या मोलगी शहर व परिसरात राजरोसपणे अवैध धंदे (Illegal trades) सुरु झाले आहे. हे धंदे चालविणार्‍यांवर कारवाई (Action) करण्यासाठी नागरिकांनी अक्कलकुवा तहसीलदारांना (Akkalkuwa Tehsildar) निवेदन (Statement) दिले आहे. त्या निवेदनात गौरवशाली परंपरेला धोका निर्माण झाल्याचे देखील नमूद केले आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, मोलगी परिसरात अवैध धंदे जोमात सुरू असल्यामुळे असंख्य बांधवांचा संसार उघड्यावर आला असून त्यांच्या परिवारातील अनेकांचे जीवनच धोक्यात सापडले आहे. त्याला सर्वस्वी दारु, सट्टा, जुगार व अन्य अवैध धंदे कारणीभूत असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. सातपुडा म्हटल्यानंतर अवैध धंद्यांना अनुकूल ठिकाण अशी ओळख निर्माण झाली असून बनावट दारुचे कारखाने, विना परवाना व चोरट्या मार्गाने दारुची वाहतुक या बाबी राजरोसपणे सुरू आहे. मोलगी परिसरातून लाकुड व अन्य वनसंपदेची तस्करी देखील मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे वैभवशाली सातपुडा बोडका झाला असून परिसरातील पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झाला आहे.

या परिसरात चोर्‍यांचे प्रमाण वाढले असून नेहमीच होणार्‍या चोर्‍यांमुळे तालुक्यातील जनजीवन अडचणीत सापडले आहे, सर्व सामान्यांमध्ये भिती निर्माण झाली आहे. चोरट्यांच्या बंदोबस्तासाठी ठोस पावले उचलावीत. शिवाय तालुक्यात काही वाहनांमधूून प्रवाशांची जिवघेणी वाहतूक सुरू असून जिवीत हानी होण्याची शक्यता आहे. अशा या प्रकारांमुळे मोलगी परिसरातील सुरक्षा ऐरणीवर आली असून शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण झाला आहे. परिसरात शांतता, सलोख्यासाठी सर्व अवैध धंदे बंद करण्यात यावे.

यासह महाराष्ट्रात गुटख्यावर बंदी असली तरी गुजरात व मध्य प्रदेश या दोन राज्यांना जोडणार्‍या मोलगी परिसरात मात्र गुटखा विक्रीला मोकळे रान आहे. परिणामी युवक व्यसनेच्या आहारी जात आहे.

त्यासाठी गुजरात व मध्य प्रदेशातून चोरट्या मार्गाने येणार्‍या गुटख्यावर बंंदी आणावी अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा साखळी पद्धतीने आंदोलने छेडण्यात येईल, असा इशारा दिला आहे. निवेदनावर अ‍ॅड सरदार वसावे, संदीप वळवी, मंगलसिंग वसावे व खेमजी वसावे यांच्या सह्या आहेत.

Related Stories

No stories found.