नंदुरबारला सव्वा दोन लाखाची अवैध दारु जप्त

स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेची कारवाई
नंदुरबारला सव्वा दोन लाखाची अवैध दारु जप्त

नंदुरबार | प्रतिनिधी- NANDURBAR

नंदुरबार शहरातील धुळे चौफुलीवर अवैधरित्या दारुची वाहतूक करणारा ट्रक पकडण्यात आला. या ट्रकमध्ये २ लाख २९ हजाराचा दारुसाठा होता. वाहनासह वाहनासह ८ लाख ४९ हजार ६०० चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, दि.१४ एप्रिल २०२१ रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांना एका मिनी ट्रकमधून देशी दारुची चोरटी अवैध वाहतुक केली जाणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती.

त्यानुसार त्यांनी पोना राकेश मोरे, सुनिल पाडवी, बापु बागुल, दादाभाई मासुळ, विशाल नागरे, पोकॉ अभय राजपूत, आनंदा मराठे यांचा धुळे चौफुली भागात सापळा रचला. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास अशोक लेलॅन्ड कंपनीचा एक मिनीट्रक कडबा चारा भरुन दोंडाईचाकडे जातांना दिसला.

सदर वाहन संशयीतरित्या वाटल्याने वाहन थांबवून चालकास वाहनातील चार्‍याबाबत विचारपूस केली असता त्याने उडावाउडवीची उत्तरे दिले. त्यामुळे वाहनाबाबत अधिक संशय निर्माण झाल्याने वाहनातील चारही बाजुला करुन झडती घेतली असता

त्यात १ लाख ७७ हजार २१६ रुपये किंमतीच्या १८० मि.ली. च्या ३ हजार ४०८ टॅन्गो पंच देशी दारुच्या बाटल्या, ७२ हजार ३८४ रुपये किंमतीच्या १ हजार ३९२ सकु संत्रा देशी दारुचे बाटल्या आढळून आल्या. वाहन व दारु असा एकूण २ लाख ४९ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी चालक उल्हास गोसावी यास रा. चाळीसगाव याच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कामगिरी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत, पोना राकेश मोरे, सुनिल पाडवी, बापू बागुल, दादाभाई मासुळ, विशाल नागरे, पोकॉ अभय राजपुत, आनंदा मराठे यांच्या पथकाने केली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com