अवैध दारु विक्री करणारे हॉटेल केली सिल

नंदुरबार उपनगर पोलीसांची कारवाई, हॉटेल मालकाविरूध्द गुन्हा
अवैध दारु विक्री करणारे हॉटेल केली सिल

नंदुरबार | प्रतिनिधी

नंदुरबार तालुक्यातील वरुळ गावाच्या शिवारात असलेल्या हॉटेल सृष्टीवर उपनगर पोलीसांनी कारवाई करत १७ हजार १४० रूपयांचा मुद्देमाल जप्त करत हॉटेल सिल केली आहे.याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात हॉटेल मालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याबाबत अधिक माहिती अशी कि, नंदुरबार तालुक्यातील वरुळ गावाच्या शिवारात नंदुरबार ते वाका चाररस्ता रोडवरील हॉटेल सृष्टीचे मालक राकेश विनायक राजपूत रा.प्लॉट नं .५६ , आकाश मोगरा कॉलनी , नंदुरबार याने

राज्य शासनाचे व जिल्हाधिकारी यांचे कोविड -१ ९ विषाणु रोगा संदर्भात निर्गमीत केलेल्या आदेशाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करुन आदेशाचे उल्लंघन करुन हॉटेल सुरु ठेऊन हॉटेलमध्ये ग्राहक बोलाऊन त्यांना विनापास परमिटाशिवाय ( दारु विक्रीचा कोणताही अधिकृत परवाना नसतांना ) गैरकायदा देशी - विदेशी दारु कब्जात बाळगुन दारुची विक्री करीत असल्याबाबत मिळालेल्या गुप्तबातमीवरुन..

उपनगर पोलिसांनी सृष्टी हॉटेलवर दि.२२ मे रोजी संध्याकाळी ७.१५ वाजता छापा टाकला . या छाप्यात ब्लेंडर स्पाईड , सिग्नेचर , मॅजिक मुव्हमेंट , स्टरलिंग रिझर्व , रॉयल स्टॅग , मॅकडॉल नं .१ , ऑफिसर चॉईस ब्लू , इंम्पेरियल ब्ल्यु , डीएसपी ब्लॅक , टँगो पंच देशी दारु , बडवायजर , टु बर्ग , किंगफिशर स्ट्रॉंग बिअर अशा विविध देशी - विदेशी दारु , बिअरचा एकूण १७ हजार १४० रुपये किंमतीचा साठा जप्त केला.

उपनगर पोलीस ठाण्यात पोना सुनिल येलवे यांच्या फिर्यादीवरून हॉटेल सृष्टीचे मालक राकेश विनायक राजपूत यांच्या विरध्द भादंवि.कलम २६८,२६ ९ , २ ९ ० सह साथरोग प्रतिबंध अधिनियम १८ ९ ७ चे कलम ३ व ४ सह महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ ( ई ) , ६८ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे .

हे हॉटेल सिलबंद करण्यासाठी वरुळ ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांना प्रस्ताव पाठविण्यात आला त्यानुसार हे हॉटेल सिलबंद करण्यात आली.

ही कारवाई पोलिस अधीक्षक महेंद्र पंडीत , अपर पोलिस अधीक्षक विजय पवार , उपविभागीय पोलिस अधिकारी , नंदुरबार विभाग सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अर्जुन पटले , पोउनि . प्रशांत राठोड , असई.रघुनाथ मराठे , पोना सुनिल येलवे , कैलास मोरे , होमगार्ड भूषण बागुल यांच्या पथकाने केली आहे . पुढील तपास पोउनि.प्रशांत राठोड हे करीत आहेत .

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com