नंदुरबार । प्रतिनिधी Nandurbar

नवापूर तालुक्यातील कोंडाईबारी भागात आज सायंकाळी 5 च्या सुमारास वादळी वार्यासह अवकाळी पाऊस झाला तर काही ठिकाणी गारपीटही झाली. या पावसामुळे गहू, कांद्यासह अनेक पिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे.

हवामान खात्याने फेब्रुवारीच्या मध्यात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविला होता. गेल्या तीन चार दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. परंतू आज सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास नवापूर तालुक्यातील ग्रामीण भागात जोरदार वादळी वार्यासह अवकाळी पाऊस झाला. सोनखांब, बोरपाडा, पानबारा, मोरकरंजा, चौकी, जामनपाडा, कोंडाईबारी घाट परिसरात या पावसामुळे गहु, कांदा, भुईमूग, मूग आदी पिकांचे नुकसान झाले आहे.तसेच वादळी वार्यासह काही ठिकाणी गारपिट झाल्याने आंब्यांच्या मोहरांचेनुकसान झाले आहे.

या अवकाळीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. रब्बी हंगामात काढणी असलेले कडधान्य युक्त आदी पिकांचे या अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे. काही भागात दुपारी अचानक ढगाळ हवामान झाले होते तर ठिक ठिकाणी अवकाळी रिमझिम पाऊस पडू लागल्यामुळे शेतकरी बांधवांची धांदल सुरू झाली. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकर्यासमोर पुन्का एकदा संकट उभे राहिले आहे.