नंदुरबार | प्रतिनिधी- NANDURBAR

नंदुरबार जिल्हयात काल रात्री १२ वाजेपासून संततधार पाऊस सुरु असल्यामुळे वातावरणात प्रचंड गारठा निर्माण झाला आहे. या पावसामुळे मिरचीचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पावसामुळे साथीच्या रोगांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, आठ तासात ३५ मि.मि.मि.मि.पावसाची नोंद कोळदा येथील कृषि विज्ञान केंद्रात करण्यात आली आहे.

नंदुरबार शहरात गेल्या चार दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. त्यातच काल सकाळपासूनच पावसाचा शिडकावा सुरु होता. मात्र, रात्री १२ वाजेपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली. सकाळी ९ वाजेपर्यंत पाऊस सुरुच होता.

या पावसामुळे वातावरणात प्रचंड गारठा निर्माण झाला असून ठिकठिकाणी सखल भागात पाणीही साचले आहे. त्यामुळे कोरोनासोबतच आता इतर साथरोग पसरण्याची भिती व्यक्त करण्यात आली आहे.

डिसेंबर महिन्यात होणारा पाऊस हा कुठल्याच पिकासाठी लाभदायी नाही. नंदुरबार हे मिरचीचे आगार मानले जाते. मिरचीचे मोठया प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. मात्र, काल झालेल्या पावसामुळे पथार्यांवर पसरविण्यात आलेल्या मिरचीचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले.

अजून दोन तीन दिवस अशाचप्रकारे पाऊस आल्यास उभ्या मिरची पिकांवर रस शोषणार्या किडीचा प्रादुुर्भाव तसेच पाने गुंडाळणार्या विषाणूचा संसर्ग होण्याची भिती व्यक्त करण्यात आली आहे.

दरम्यान, काल रात्रीपासून नंदुरबारात ३५ मि.मि.पावसाची नोंद कोळदा येथील कृषि विज्ञान केंद्रात करण्यात आली आहे.