नंदुरबार - Nandurbar :

नाशिक, अहमदनगरनंतर अवकाळी पावसाने नंदुरबार जिल्ह्यालाही जोरदार तडाखा दिला असून अचानक बदललेल्या या वातावरणामुळे शेतकर्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. शुक्रवारी दुपारी नंदुरबार जिल्ह्याला मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याने सर्वत्र धावपळ उडाली.

नंदुरबार शहरासह जिल्ह्यात आज दुपारी मुसळधार पावसाने झोडपून काढले. या पावसामुळे गहू, मका, पपई, मिरची आदी पिकांचे नुकसान झाले आहे.

नंदुरबार शहरासह जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून ढगाळ वातावरण आहे. त्यातच काल दि.7 रोजी तळोदा, शहादा परिसरात पाऊस झाला होता.

दरम्यान आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरुवात झाली. तब्बल दीड ते दोन तास मुसळधार पावसाने झोडपून काढले.

या पावसामुळे संपूर्ण जिल्हा जलमय झाला. ठिकठिकाणी पावसाचे तळे साचले. दरम्यान, या जोरदार पावसामुळे गहू, पपई, मका, मिरची आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकर्यांवर पुन्हा एकदा अस्मानी संकट ओढवले आहे.