१८ लाखाच्या गुटख्यासह ३३ लाखाचा मुद्देमाल जप्त

गुजरात राज्यातुन मध्यप्रदेशात जात होता गुटखा, पाच जणांविरूध्द गुन्हा
१८ लाखाच्या गुटख्यासह ३३ लाखाचा मुद्देमाल जप्त

नंदुरबार | प्रतिनिधी - nandurbar

प्रकाशा ता.शहादा येथे गुजरात राज्यातुन मध्यप्रदेश राज्यात जाणारा अवैध गुटख्याने भरलेला ट्रॉला ट्रक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने पकडला असुन १८ लाखाच्या गुटख्यासह ३३ लाखाचा मुद्देमाल जप्त जप्त केला आहे.याप्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात ५ जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याबाबत अधिक माहिती अशी की, मिळालेल्या गुप्त बातमीनुसार पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांंच्या मार्गदर्शनखाली गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपुत यांनी पथकासह मिळालेल्या बातमीनुसार

प्रकाशा गावाजवळ तळोदा रस्त्यावरील आप्पाच्या ढाब्याजवळ सापळा लावला. सदर ढाब्यावर ट्रॉला ट्रक (क्र. एम.पी.०९,एच.एफ.८५६३) हा संशयीतरित्या आल्याने पथकाने त्याच्यावरील ट्रक व क्लिनर यांना ताब्यात घेऊन विचारपुस केली.त्यांनी ट्रकमध्ये प्लास्टीकचे दाने असल्याचे सांगितले.

ट्रकची ताडपत्री उघडून पाहिले असता त्यात प्लास्टीकचे दान्यांचे गोण्या दिसत होत्या. तथापि मिळालेली बातमी खात्रीशिर असल्याने तसेच ट्रक ड्रायवर याची वर्तणूक संशयीत असल्याने त्यास अधिक विश्वासात घेऊन विचारपुस केली असता त्याने प्लास्टीक गोण्यांचे २ थरांचे खाली गुटखा असल्याचे मान्य केले.

त्यानुसार ट्रकमधील प्लास्टीक दाण्यांच्या गोण्या उतरवून खात्री केली असता एकूण १५ लाख ५५ हजार ८४० रुपये किमंतीचा ४० गोण्या विमल गुटखा व २ लाख ७४ हजार ५६० रुपये किमतीची विमल गुटख्यात मिक्स करण्यासाठीची ४० गोण्या त-१ सुंगंधीत तंबाखु मिळुन आले.

सदर गुटख्याबाबत त्यास विचारपुस करता आम्ही सदरचा विमल गुटखा हा गुजरात राज्यातील वापी येथील कृष्णा तंबाकु टेडर्स येथुन भरला असुन तो मध्यप्रदेश राज्यातील बर्‍हाणपुर येथील नवीन टेडर्स येथे घेवुन जात होतो असे सांगितले.

महाराष्ट्रात बंदी असलेला सदर अवैध गुटखा व ट्रक ट्रॉला रु. १५ लाख असा एकूण ३३ लाख ३० हजार ४०० किमंतीचा मुद्देमाल जप्त करुन साबीर शेख गब्बु शेख रा. भौरांसा ता.सोनखच जि.देवास (मध्यप्रदेश राज्य), इरफान खान इक्बाल खान रा. भौरांसा ता.सोनखचवास (मध्यप्रदेश),

गुजरात राज्यातील वापी येथील कृष्णा टेडर्सचे मालक, मध्यप्रदेश राज्यातील नवीन टेडर्सचे मालक या आरोपीतांविरुध्द भादंवि कलम १८८,२७२,२७३ सह अन्न सुरक्षा मानके अधिनियम २००६ चे कलम २६(२),(४),३०(२)(र) प्रमाणे शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपुत, पोहवा मुकेश तावडे, पोना बापु बागुल, राजेंद्र काटके याच्या थकाने पार पाडली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com