राज्यपाल आज नंदुरबार जिल्ह्यात

राज्यपाल आज नंदुरबार जिल्ह्यात

राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे उद्या दि.20 व 21 फेब्रुवारी रोजी नंदुरबार जिल्हा दौर्‍यावर येत आहेत. त्यांचा मिनीट टू मिनीट कार्यक्रमही जाहीर झाला आहे.

राज्यपाल श्री.कोश्यारी यांचे उद्या दि.20 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता मोलगी येथे आगमन होईल. 9.05 ते 9.45 मोलगी ग्रामीण रुग्णालयातील पोषण पुनर्वसन केंद्राला भेट, 9.50 ते 10 मोलगी येथील भगर प्रोसेसिंग युनीटला भेट, 10.30 ते 11 भगदरी येथील आदिवासी सांस्कृतिक भवनाचे उद्घाटन, 11 ते 12.15 राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली आकांक्षित जिल्हयाच्या अनुषंगाने आदिवासी सांस्कृतिक भवनात बैठक, 2.35 ते 2.50 भगदरी येथील जलयुक्त शिवार योजनेंतर्गत कृषि विभागातर्फे करण्यात आलेल्या माती नालाबांधच्या कामाची पाहणी, 2.50 ते 3 भगदरी येथील अंगणवाडीस भेट, किचन गार्डनची पाहणी, 3 ते 3.30 गोट फार्म युनीट, पोल्ट्री फार्म युनीट, सिमेंट नालाबांधची पाहणी, 3.40 ते 4 भगदरी येथील पेरु बागेची पाहणी, 4.05 ते 4.20 भगदरी येथील पशुवैद्यकीय चिकित्सा केंंद्राचे अनावरण, 4.20 ते 4.45 शासकीय आदिवासी आश्रमशाळेला भेट, 4.45 ते 5.45 शासकीय आश्रमशाळेत सांस्कृतिक कार्यक्रम व संबोधन, 5.45 ते 5.50 शासकीय आश्रमशाळेतून भगदरी आदिवासी सांस्कृतिक भवनाकडे प्रयाण व मुक्काम.

दि. 21 रोजी 8.30 ते 9 भगदरी येथून मोलगी येथील हेलिपॅडवर आगमन, 9 ते 9.30 मोलगी येथून नंदुरबारकडे प्रयाण, 9.30 ते 9.40 नंदुरबार येथील शासकीय विश्रामगृहावर आगमन, 9.40 ते 10.15 शासकीय विश्राम गृहावर राखीव, 10.25 ते 10.55 विधी महाविद्यालयात कार्यक्रम, 11.20 ते 11.50 जळखे आश्रमशाळेत भेट व विद्याथ्यार्ंंशी संवाद, 12.20 ते 1.20 नावली ता.नवापूर

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com