शासनातर्फे ‘ई-संजीवनी ओपीडी’ सेवा सुरू

राज्यात दररोज ३०० रुग्ण घेताहेत सुविधेचा लाभ
शासनातर्फे ‘ई-संजीवनी ओपीडी’ सेवा सुरू
USER

नंदुरबार | प्रतिनिधी- NANDURBAR

कोरोना काळात डॉक्टरांकडून घरबसल्या मोफत सल्ला घेण्यासाठी शासनातर्फे ‘ई-संजीवनी ओपीडी’ ही ऑनलाईन सेवा सुरू करण्यात आली आहे. राज्यात दररोज ३०० रुग्ण या सुविधेचा लाभ घेत आहेत.

ई-संजीवनी ऍपद्वारे आता सोमवार ते रविवार सकाळी ९ ते दुपारी १ आणि दुपारी १.४५ ते सायंकाळी ५ या वेळेते डॉक्टरांचा सल्ला घेता येणार आहे. रविवार आणि सुटीच्या दिवशीदेखील ही सेवा सुरू राहणार आहे.

सेवेचा लाभ घेणार्‍या रुग्णांना एसएमएसद्वारे ई-प्रिस्क्रीप्शन प्राप्त होते. ते दाखवून रुग्ण नजीकच्या सरकारी रुग्णालयातून औषधे घेऊ शकतात.

राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्‍यांची नोंदणी या ऍप्लिकेशनमध्ये करण्यात आली आहे.

राज्यात दररोज ३०० रुग्ण या सुविधेचा लाभ घेत आहेत. ही सेवा अत्यंत उपयुक्त असल्याने जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांनी ‘ई-संजीवनी ओपीडी’ ऍप डाऊनलोड करून या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.रघुनाथ भोये यांनी केले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com