नंदुरबार : बिबट्याच्या हल्ल्यात बालिका ठार
नंदुरबार

नंदुरबार : बिबट्याच्या हल्ल्यात बालिका ठार

परिसरात भितीचे वातावरण

Rajendra Patil

चिनोदा | वार्ताहर Nandurbar

सोजरबार (ता.तळोदा) येथे आज पहाटेच्या सुमारास बिबटयाने झोपडीतील चार वर्षीय बालिकेस उचलून नेवून ठार केल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून भितीचे वातावरण पसरले आहे.

तळोदा तालुक्यातील सोजरबार येथे आज पहाटेच्या सुमारास झोपडीत झोपलेल्या एका चार वर्षीय बलिकेला बिबट्याने उचलून नेले. मुलीने आरडाओरड केल्याने तीच्या आवाजाने तिच्या वडीलांना जाग आली. त्यांनी बिबट्याचा पाठलाग केला. बिबट्याने मुलीस काही अंतरावर फेकले.  

मात्र, तोपर्यंत बालिकेचा मृत्यू झाला होता. ही घटना सोमावल बिटातील सोजरबार येथे घडली असून वन विभागाकडून घटनास्थळी जाऊन पाहणी केली. वनक्षेत्रपाल सी.डी.कासार, सहायक वनसंरक्षक कापसे, वनक्षेत्रपाल अक्कलकुवा सोनाली गिरी, हवालदार मोहन वळवी, पो.नाईक, दिनकर गुले, बोरदचे वनपाल आंनद पाटील, वनरक्षक आर.जे. शिरसाठ, विरसिंग पावरा, राज्या पावरा, श्रावण कुंवर, एस.आर.देसले यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

Deshdoot
www.deshdoot.com