दुधाचे कॅन चोरी करणारी टोळी अटकेत

शहादा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई
दुधाचे कॅन चोरी करणारी टोळी अटकेत

नंदुरबार । Nandurbar प्रतिनिधी

शहादा येथील दूध उत्पादक संघाच्या कार्यालयात दूध संकलनाचे 100 कॅन चोरी केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने चौघांना अटक केली असून त्यांच्याकडून चोरीला गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

दि. 5 ते 6 जुलै दरम्यान शहादा शहरातील दुध उत्पादक व कृषीपुरक उद्योग सहकारी संघ लि. शहादा येथील कार्यालयाच्या मागील बाजुस असलेले लोखंडी शटर तोडून 1 लाख रुपये किमंतीचे 100 दुध संकलनासाठीचे स्टीलचे कॅन चोरी झाल्याने दुध उत्पादक व कृषीपुरक उद्योग सहकारी संघाचे मॅनेजर उद्धव भबुता पाटील यांच्या फिर्यादीवरुन शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवत गुन्हेगारी पार्श्वभुमी असलेल्या आरोपीतांबाबत माहिती काढली.

दि.1 ऑगस्ट 2021 रोजी पोलीस निरीक्षक कळमकर यांना माहिती मिळाली की, दुध उत्पादक संघ येथे झालेली चोरी मलोणी ता.शहादा येथील विशाल व त्याच्या 5 ते 6 साथीदारांच्या मदतीने केली असून तो सध्या मलोणी परीसरातच फिरत आहे अशी खात्रीशिर बातमी मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने तात्काळ मलोणी येथे जावून विशाल यास शिताफीने ताब्यात घेतले. त्याचे नांव विशाल भगवान ठाकरे (वय-20) रा. समता नगर, मलोणी ता.शहादा असे आहे.

त्यास दुध उत्पादक संघ येथे झालेल्या चोरीबाबत विचारपुस केली. त्याने सदरचा गुन्हा त्या साथीदार अविनाश काशिनाथ सामुद्रे (वय-21) रा. लहान शहादा, राजेश ब्रिजलाल भिल (वय-19) रा. लहान शहादा, रविंद्र भगवान भामरे वय-18 रा. समता नगर मलोणी यांच्यासह केल्याचे कबुल केले. त्या सर्वांना ताब्यात घेण्यात आले. तसेच गुन्ह्यातील दुधाचे सर्व कॅन हस्तगत करण्यात पोलीसांना यश आले आहे.

सदर कामगिरी पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित, अपर पोलीस अधिक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक देवराम गवळी, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस हवालदार दिपक गोरे, पोलीस नाईक राकेश मोरे पोलीस अमंलदार विजय ढिवरे, अभय राजपुत, आनंदा मराठे, सतिष घुले यांच्या पथकाने केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com