शहादा - Shahada :

अयोध्या येथील भव्यदिव्य राममंदिरासाठी निधी संकलनासाठी शहादा येथे सेवाभावी संघटना पुढे सरसावल्या असून त्याची सुरुवात भावसार मढी येथील हिंगलाज माता मंदिरात विधीवत पूजाअर्चाने करण्यात आली.

पंकज भावसार यांनी सपत्नीक पूजा व आरती करून निधी संकलनाची सुरुवात केली. संजय कासोदेकर, वस्ती क्र.3 चे पालक जयेश देसाई, पालक गौरव जोशी, कृणाल शिंदे, सनी सोनार, तुषार कुंभार, मनोज वाडीले आदी कार्यकर्त्यानी निधी संकलनास सुरुवात केली.

निधी संकलन हे मच्छीबजार, कुंभार गल्ली, भोई गल्ली, रामगड, शामगड, टेक भिलाटी, मेनरोड, मारवाडी गल्ली परिसरात केले जात आहे.

15 फेब्रुवारीपर्यंत निधी संकलन अभियान सुरू राहणार सुरू राहणार असल्याचे जयेश देसाई यांनी सांगितले.