नवापूर तालुक्यात वनविभागाची मोठी कारवाई

दुधवे येथे 9 लाखांचे अवैध लाकूड जप्त
नवापूर तालुक्यात वनविभागाची मोठी कारवाई

नवापूर - Navapur - श.प्र :

तालुक्यातील दुधवे येथे वनविभागाने छापा टाकून सुमारे 9 लाख रुपयांचे अवैध लाकूड जप्त केले.

याबाबत अधिक माहिती अशी की, सहाय्यक वनसंरक्षक नंदुरबार धनंजय पवार वनविभाग शहादा (प्रादेशिक व वन्यजीव) आर.बी .पवार, वनक्षेत्रपाल (प्रा) चिंचपाडा व नवापूर, नंदुरबार, चिंचपाडा, खांडबारा, गस्तीपथक शहादा आदी वनकर्मचार्‍यांनी दुधवे गावात जाऊन पोलीस पाटील दुधवे व सरपंच दुधवे यांना सोबत घेऊन छापा टाकला असता संदीप वळवी, दशरथ वसावे, रोहिदास पाडवी, विरजी वळवी (सर्व राहणार दुधवे) यांच्या घरात साग नग 448, सिसम नग 10, सोफा, पलंग नग असे एकूण अंदाजे 7 ते 8 घ.मि. कट साइज, गोल व फिनिश टिंबर माल व एक रंधा मशीन मिळून आले.

अंदाजित बाजारभावानुसार या लाकडाची किंमत 8 ते 9 लाख रुपये आहे. सदर कारवाहीत वनपाल डी.के.जाधव, विजय तेले, युवराज भाबड, एस.एन.पाटील, पी.डी.पवार, आरती नगराळे, सर्व वनरक्षक,वनमजूर,वाहन चालक विसरवाडी पोलिस कर्मचारी महादेव गुठे, मनिंदर नाईक यांनी भाग घेतला.

सदर कार्यवाही ही मुख्य वनसंरक्षक धुळे दि.वा.पगार, उपवनसंरक्षक नंदुरबार वनविभाग एस.बी.केवटे, शहादा, उमेश वावरे, विभागीय वनअधिकारी दक्षतज्ञ धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

वन व वन्यजीव तसेच अवैधवाहतूक लाकूड संबधित कुठाला गैरप्रकार निदर्शनास आल्यास तात्काळ टोल फ्री नंबर 1926 वर संपर्क करावा असे आवाहन वनविभागाने केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com