तळोद्याच्या खर्डी नदीला पूर

परिसरातील भूजल पातळी वाढणार
तळोद्याच्या खर्डी नदीला पूर

मोदलपाडा ता.तळोदा । वार्ताहर TALODA

सातपुडयाच्या दुर्गम भागात व तळोदा शहरासह ग्रामीण भागामध्ये गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे तळोदा शहरातून वाहणार्‍या खर्डी नदीला पूर आला़ आहे, नदीला आलेला हा पूर पाहण्यासाठी...

नदीच्या काठांवर नागरिकांनी गर्दी केली होती़ नदीपात्रात यंदा खोलीकरण करण्यात आल्याने परिसरात सिंचन होणार असून पाण्याची चिंता मिटल्याचा आनंद शेतकरी आणि नागरिकांच्या चेहर्‍यावर झळकतांना दिसून येत आहे.

खर्डी नदीपात्राच्या दुर्दशेवर गेल्या दोन वर्षापासून पालिकेच्या सहकार्याने काही सेवाभावी संस्थांनी मिळून खोलीकरणाचे काम केले आह़े या कामामुळे नदीचे पात्र रुंदावून खोलीही वाढली आह़े परिणामी आसपासच्या शेतकर्‍यांच्या विहिरी व कूपनलिकांचे सिंचन होणार आह़े.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com