प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांच्या हस्ते ध्वजारोहण

प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांच्या हस्ते ध्वजारोहण

नंदुरबार - Nandurbar - प्रतिनिधी :

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 71 व्या वर्धापन दिनानिमित्त राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांच्या हस्ते पोलीस कवायत मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले.

या सोहळ्याला जि.प.अध्यक्षा ॲड.सीमा वळवी, खासदार डॉ.हिना गावीत, आमदार राजेश पाडवी, माजी मंत्री पद्माकर वळवी, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, जि.प.उपाध्यक्ष ॲड.राम रघुवंशी, समाजकल्याण सभापती रतनदादा पाडवी, महिला व बालकल्याण सभापती निर्मलाताई राऊत आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतीय राज्य घटनेच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले. पालकमंत्री ॲड.पाडवी यांच्या हस्ते कोरोना संकटकाळात चांगली कामगिरी करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा कोरोना योद्धा म्हणून प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

विविध पुरस्काराचे वितरण

त्यांच्या हस्ते गुणवंत खेळाडू, गुणवंत क्रीडा मार्गदर्शक, गुणवंत क्रीडा कार्यकर्ता आणि गुणवंत दिव्यांग खेळाडू पुरस्कारांचे वितरणदेखील करण्यात आले. तसेच जिल्ह्यातील महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना यामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शासकीय व खाजगी रुग्णालयांचा प्रशस्ती पत्र देऊन सन्मान करण्यात आला. सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत गुणवत्तेनुसार निवड झालेल्या विद्यार्थ्यांना पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

सशस्त्र ध्वजदिन निधी संकलन-2019 करीता 31 लाख 30 हजार इतका इष्टांक नंदुरबार जिल्ह्याने वेळेच्या आत पुर्ण केल्याबद्दल संचालक, सैनिक कल्याण विभाग पुणे यांच्यामार्फत उत्कृष्ट कार्याबद्दल देण्यात येणारा पुरस्कार जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड आणि जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयातील सुभेदार रामदास पाटील यांना प्रदान करण्यात आला.

पालकमंत्र्यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे लोकार्पण

आकांक्षित जिल्हा कार्यक्रमांतर्गत माझगाव डॉक शिप बिल्डर्स यांच्यामार्फत सीएसआर निधीतून घेण्यात आलेल्या 11 रुग्णवाहिकांचे पालकमंत्री ॲड.पाडवी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यापैकी 9 रुग्णवाहिका ग्रामीण भागासाठी आणि 2 जिल्हा रुग्णालयासाठी उपयोगात येणार आहेत. ग्रामीण भागातील रुग्णसेवेसाठी रुग्णवाहिकांचा चांगला उपयोग होईल असा विश्वास यावेळी ॲड.पाडवी यांनी व्यक्त केला.

पोलीस वाहनांचे लोकार्पण

पालकमंत्र्यांच्या हस्ते 13 पोलीस वाहनांचे लोकार्पण करण्यात आले. जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत या वाहनांसाठी 90 लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. पोलीसांना वाहन प्राप्त झाल्याने कायदा व सुव्यवस्था राखण्यात मदत होणार आहे. पोलीस दलासाठी आवश्यकतेनुसार आणखी वाहने देण्यात येतील असे ॲड.पाडवी यांनी यावेळी सांगितले.

रक्तपेढी इमारतीचे उद्घाटन

ॲड.पाडवी यांच्या हस्ते जिल्हा रुग्णालय परिसरातील रक्तपेढीचे उद्घाटन करण्यात आले. ही इमारत सर्व सुविधांनी युक्त असणार आहे. जिल्ह्यातील रक्ताची गरज पूर्ण करण्यासाठी आणि रक्त परिक्षणासाठी रक्तपेढी आदिवासी भागासाठी महत्वाची ठरणार आहे. पालकमंत्र्यांनी रक्तपेढीतील विविध सुविधांची माहिती घेतली.

मोबाईल बँकेचे उद्घाटन

दुर्गम भागातील बँकींग व्यहवार सुरळीत व्हावे आणि नागरिकांना गावातच बँकेची सुविधा मिळावी यासाठी नाबार्डच्या एफआयएफ निधीतून धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी देण्यात आलेल्या दोन मोबाईल एटीएम वाहनाचे उद्घाटन पालकमंत्री ॲड.पाडवी यांनी केले. या सुविधेमुळे गरीब आदिवासी बांधवांचा शहरात येण्याचा खर्च वाचेल आणि बँकेच्या माध्यमातून त्यांना विविध शासकीय येाजनांचा लाभ घेता येईल असा विश्वास पालकमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

त्यांच्या हस्ते गुणवंत खेळाडू, गुणवंत क्रीडा मार्गदर्शक, गुणवंत क्रीडा कार्यकर्ता आणि गुणवंत दिव्यांग खेळाडू पुरस्कारांचे वितरणदेखील करण्यात आले. तसेच जिल्ह्यातील महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना यामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शासकीय व खाजगी रुग्णालयांचा प्रशस्ती पत्र देऊन सन्मान करण्यात आला. सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत गुणवत्तेनुसार निवड झालेल्या विद्यार्थ्यांना पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

सशस्त्र ध्वजदिन निधी संकलन-2019 करीता 31 लाख 30 हजार इतका इष्टांक नंदुरबार जिल्ह्याने वेळेच्या आत पुर्ण केल्याबद्दल संचालक, सैनिक कल्याण विभाग पुणे यांच्यामार्फत उत्कृष्ट कार्याबद्दल देण्यात येणारा पुरस्कार जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड आणि जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयातील सुभेदार रामदास पाटील यांना प्रदान करण्यात आला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com