नंदुरबार : जिल्हयात करोनाचे पाच रुग्ण आढळले

तिघे संसर्गमुक्त
नंदुरबार : जिल्हयात करोनाचे पाच रुग्ण आढळले

नंदुरबार | प्रतिनिधी

जिल्हयात आज पाच व्यक्तींचा करोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. यात नंदुरबार शहरातील तीन, नवापूर व खोंडामळी येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

दरम्यान आज २४ संशयितांचे अहवाल निगेटीव्ह आले असून तीन व्यक्ती संसर्गमुक्त झाले आहेत. नंदुरबार जिल्हयात गेल्या चार दिवसांपासून कोरोना रुग्णांचे स्वॅब घेण्याची प्रक्रिया थांबली होती. कालपासून धुळे येथील प्रयोगशाळेत पुन्हा स्वॅब तपासणीला सुरुवात झाली आहे.

आज नंदुरबार जिल्हयातील रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. आज जिल्हयातील पाच जणांचे कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. यात नंदुरबार येथील रेल्वे कॉलनीतील ३६ वर्षीय पुरुष, नंदुरबार पंचायत समितीतील ३२ वर्षीय पुरुष, देसाईपुरा येथील ५० वर्षीय महिला, नवापूर येथील मंगलदास पार्क येथील ६५ वर्षीय महिला, तर खोंडामळी ता.नंदुरबार येथील ५० वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. यापैकी चार रुग्णांवर यापुर्वीच जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते त्यामुळे जिल्हयातील कोरोना रुग्णांची एकुण संख्या १६८ झाली आहे.

सध्या जिल्हा रुग्णालयात ७६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दरम्यान, आज २४ व्यक्तींचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. तसेच सिंधी कॉलनीतील तीन व्यक्ती संसर्गमुक्त झाल्याने त्यांना जिल्हा रुगणालयातून घरी पाठविण्यात आले आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com