सोमावल ता.तळोदा । वार्ताहर

कोरोना या जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर गेल्या सात आठ महिन्यांपासून तालुकास्तरावर उप प्रादेशिक विभागाने बंद केलेला वाहन पासिंगच्या कँम्पमुळे वाहन धारकांचे प्रंचंड हाल होत असून त्यांची आर्थिक लूट देखील केली जात असल्याचा आरोप आहे. आता शासनाने जवळपास बहुतेक क्षेत्रामध्ये शिथिलता आणली आहे.त्यामुळे या विभागानेही तातडीने कॅम्प पूर्ववत सुरू करावे.अशी मागणी वाहनधारक यांच्या मधून जोर धरू लागली आहे.

नंदुरबार उपप्रादेशिक विभाग अर्थात आर.टी.ओ.कार्यालयाकडून दर महिन्याच्या सुरुवातीस अथवा अखेरीस वाहन परवाना,वाहन पासिंग व नुतनीकरण साठी तालुका स्तरावर कँम्प घेतला जात असतो.साहजिकच तळोदा बरोबर अक्कलकुवा तालुक्यातील वाहनधारक आपआपली वाहने पासिग करीता आणत असतात. एक प्रकारे त्यांची सोय झाली होती.कारण वाहनधारक याना नंदुरबारला जावे लागत होते.

शिवाय वेळ व पैशांची बचत झाली होती.तथापि मार्च महिन्यापासून देशा बरोबरच राज्यातही कोरोना या जागतिक महामारीने डोके वर काढल्यामुळे शासनाने तेव्हा पासूनच लॉक डाउन केले होते.परिणामी सर्वच विभाग देखील बंद करण्यात आले होते. त्याच बरोबर उप प्रादेशिक परिवहन विभाग ही गेल्या सात आठ महिन्यांपासून तालुकास्तरीय कँम्प बंद होता.मात्र शासनाने आता जवळपास सर्वच क्षेत्रातील लॉक डाउन उठवून त्यात मोठी शिथिलता दिली आहे.त्यामुळे शासनाचे बहुतेक विभाग सुध्दा पूर्ववत सुरू झालेले आहे.हे विभाग सुरळीत झाले आहेत.अशी वस्तूस्थीती असताना नंदुरबार येथील आर.टी.ओ. कार्यालयाने अजूनही तालुका स्तरावरील वाहन पासिंगचे कँम्प सुरू केलेले नाही.

त्यामुळे वाहन पसिंग ,लायसन्स करिता वाहनधारकांना मोठ्या अडचणी चा सामना करावा लागत आहे.त्यासाठी त्यांना नंदुरबार कार्यालयात जावे लागत आहे.यात त्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. शिवाय दिवसभर तेथे थांबावे लागत असल्यामुळे वेळ देखील वाया जात असतो. कोरोनाचा प्रादुर्भावामुळे तालुका स्तरावरील कँम्प सुरू होत नसल्याचे सांगितले जात असले तरी सर्वच वाहनधारक नंदुरबार कार्यालयात जात असल्याने तेथे मोठी गर्दी होत असते.तेथील प्रचंड गर्दीमुळे सोशल डिस्टनसिंग चा अक्षरशः फज्जा उडत असतो.साहजिकच वाहन धारक अतिशय हैराण झाले आहेत .

वास्तविक शासनाचे सर्वच विभाग सुरू झालेले आहेत.असे असूनही उप प्रादेशिक परिवहन विभागाला कँम्प अजून तालुका स्तरावरील चालू करण्याची परवानगी दिली जात नाही.असा सवाल वाहन धारकांनी उपस्थित केला आहे.नवीन वाहन परवाना अथवा नूतनीकरासाठी वाहन चालकांकडून अवाच्चा,सव्वा रक्कम घेतली जात असल्याच्या आरोप वाहनधारकांनी केला आहे.या बाबत उप प्रादेशिक परिवहन अधिकारीनी लक्ष घालण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.शिवाय गेल्या आठ महिन्यांपासून बंद करण्यात आलेला तालुका स्तरावरील कँम्प पुन्हा पूर्ववत सुरू करावा.यासाठी या विभागाच्या वरीष्ठ अधिकरीनी लक्ष घालावे.अन्यथा या विरोधात आंदोलन छेडण्याचा ईशारा देण्यात आला आहे.

नंदुरबार आर.टी.ओ.कार्यालयात वाहन धारकाने आपल्या वाहनाचे पासींग केल्या नंतर आरसी बूक टपाला मार्फत सबंधित वाहनधारकास दिले जात असते. परंतू हे आरसी बूक लवकर मिळत नाही.असे वाहनधारकांची व्यथा आहे. काही वाहन धारकांनी आपल्या वाहनाची पासिंग करून साधारण चार महिने झाले आहेत.

तरीही त्यांना अजुन पावेतो मिळालेले नाही. ते टपाल कार्यालयात हेलपाटे मारून अक्षरशः वैतागले आहेत.एवढेच नव्हे तर साधा परवाना काढण्यासाठी 1 हजार 400 रुपयाच्या फी असतांना तब्बल 2 हजार 200 रुपये मोजावे लागत असल्याचा आरोप देखील काही वाहन धारकांनी केला आहे.या प्रकरणी अधिकारींचे सबंधित व्यक्तीवर वचक नसल्यामुळे बिन बोभाट पने आर्थिक लूट चालू आहे.असाही आरोप केला जात आहे.एवढे पैसे भरून देखील वाहनचालक परीक्षा देण्यासाठी नंदुरबार कार्यालयात जावे लागत असते.त्यामुळे वाहन धारकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.